

चिपळूण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक ९ तारखेला होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे सेना भाजप युतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी एकमत झाले आहे.
मात्र सभापतीपदाची पहिली अडीच वर्षांची संधी कोणाला द्यायची यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
chiplun ncp-Shivsena bjp alliance : चिपळूण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक सोमवारी (ता.९) होणार आहे. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिंदे शिवसेना-भाजप युतीचे एकमत झाले आहे, मात्र सभापतीची पहिली संधी कोणाला, याचा फैसला अद्याप झालेला नाही. पहिली अडीच वर्षे सभापतिपद राष्ट्रवादीला द्यावे, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंचायत समितीच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना-भाजप युतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी हातमिळवणी करावी लागणार आहे. सत्ता स्थापनेसाठी ठाकरे सेनेला बाजूला ठेवून महायुतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, सभापतिपदासाठी फॉर्म्युला निश्चित झालेला नाही.
पंचायत समिती निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बाजूला करून शिंदेसेना भाजप युतीने बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिंदेसेनेला चार तर भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सात जागा मिळाल्याने आमदार शेखर निकम यांची ‘पॉवर’ वाढली. यातूनच ठाकरे सेनेला बाजूला करत आमदार निकम यांना सत्ता स्थापनेसाठी गळ घालण्यात आली. त्यावर आमदार निकम राजी झाल्याची चर्चा आहे.
मात्र सत्ता स्थापनेत सुरवातीची अडीच वर्षे राष्ट्रवादीला सभापतिपद देण्याची मागणी आमदार निकमांनी केली. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सभापतिपदासाठी सूर्यकांत खेतले यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेनेकडून विनोद झगडे, संदेश आयरे आणि भाजपकडून विनोद भूरण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. प्रांताधिकारी आकाश निगडे यांच्या उपस्थितीत ९ मार्चला पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक होणार आहे.
सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, तसेच शिंदेसेना भाजप युतीकडून अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. योग्य वेळी सत्ता स्थापनेचा निर्णय जाहीर केला जाईल.
सदानंद चव्हाण, माजी आमदार, चिपळूण
1. चिपळूण पंचायत समितीची निवडणूक कधी आहे?
सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक सोमवारी ९ तारखेला होणार आहे.
2. कोणकोणत्या पक्षांमध्ये युती झाली आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे सेना भाजप युतीमध्ये एकमत झाले आहे.
3. वाद नेमका कशावर आहे?
सभापतीपदाची पहिली अडीच वर्षांची संधी कोणाला द्यायची यावर तिढा आहे.
4. शेखर निकम यांनी काय मागणी केली आहे?
पहिली अडीच वर्षे सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावे, अशी मागणी त्यांनी केल्याचे सांगितले जाते.
5. या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
निर्णयानुसार कोकणातील स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.