Shrivardhan Sarpanch Trouble : दिवेआगारचे लोकनियुक्त सरपंच अडचणीत : तहसीलदारांकडून तोडणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश; माहिती लपवणे आले अंगलट

Shrivardhan Sarpanch Affidavit Controversy : निवडणूक शपथ पत्रात मालमत्तेसंदर्भात माहिती लपवणे दिवेआगरच्या लोकनियुक्त सरपंचाच्या अंगलट आले असून श्रीवर्धनचे महसूल नायब तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Diveagar Sarpanch Vijay Todankar in Trouble
Diveagar Sarpanch Vijay Todankar in TroubleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shrivardhan News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणे लोकनियुक्त सरपंचाच्या चांगलेच अंगलट आल्याचे समोर आले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच विजय सुदाम तोडणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीवर्धनच्या महसूल नायब तहसीलदारांनी दिले आहेत. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती जाणीवपूर्वक लपवल्याप्रकरणी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दिवेआगर ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक एप्रिलमध्ये पार पडली असून, या निवडणुकीत विजय तोडणकर हे थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आले आहेत. दरम्यान, त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या व कुटुंबाच्या मालकीची स्थावर मालमत्ता जाणीवपूर्वक लपवली, अशी तक्रार ग्रामस्थ सिद्धेश कोसबे व महेश पिळणकर यांनी तहसील कार्यालयात केली होती.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत, माणगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता त्यांच्या नावावर असतानाही तोडणकर यांनी शपथपत्रात तिचा उल्लेख केला नाही, असा दावा करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत अर्जदारांनी ही फसवणूक व भ्रष्टाचार असल्याचे म्हटले होते.

Diveagar Sarpanch Vijay Todankar in Trouble
Kokan Politics : ‘माझी कामे अडवली, तर थेट...’; तटकरेंचा रत्नागिरी 'डीपीडीसी' बैठकीतच पारा चढला, सामंतांना करावी लागली मध्यस्थी

या तक्रारीनंतर श्रीवर्धन तहसील कार्यालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच महसूल व कर विभागाकडून मिळवलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली. यामध्ये माणगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता तोडणकर यांच्या नावावर असल्याचे समोर आले.

दरम्यान, हे सर्व आरोप लोकनियुक्त सरपंच तोडणकर यांनी फेटाळले आहेत. त्यांनी याबाबत बचावात्मक युक्तिवादही केला आहे. पत्नीच्या निधनानंतर वारसाहक्काने ही मालमत्ता आपल्या नावावर आली. त्यामुळे नजरचुकीने तिचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच निवडणुकीदरम्यान नगरपंचायतीची कोणतीही थकबाकी नव्हती, असाही दावा त्यांनी केला आहे.

मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उमेदवाराने आपली संपत्ती व दायित्वाची अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. शपथपत्रात माहिती लपवणे हा मतदारांची फसवणूक करण्याचा प्रकार असून, त्यातून कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

Diveagar Sarpanch Vijay Todankar in Trouble
Kokan Politics : दोन कट्टर विरोधकांची भेट अन् शिवसेनेत अस्वस्थता, तटकरेंच्या भेटीनंतर गोगावलेंना दळवींचा सूचक टोला; 'आम्ही केलेला संघर्ष...'

श्रीवर्धनच्या महसूल नायब तहसीलदारांनी तोडणकर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलमांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. या कारवाईनंतर विरोधक आक्रमक झाले असून, नैतिकतेचा हवाला देत तोडणकर यांनी लोकनियुक्त सरपंचपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या कायदेशीर कारवाईमुळे सरपंच विजय तोडणकर यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.