Eknath Shinde Politics : "डझनभर नेत्यांना संधी, पण खास शिलेदारालाच डच्चू; केसरकरांच्या एक्झिटमागे नेमकं 'राज'कारण काय?"

Eknath Shinde Reshuffle Shivsena : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आता आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसह पक्षाची बांधणी करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला आहे.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. स्थानिक निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

  2. मराठवाड्यात पक्ष मजबूत करण्यासाठी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

  3. दीपक केसरकर यांचे नाव वगळल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Kokan Politics : नुकताच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या असून महायुतीला मोठे यश मिळाले. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील मोठं यश मिळाले आहे. यानंतर आता आगामी काळात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांसह मराठवाड्यात पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी शिंदेंनी रणनीती आखली आहे. त्यांनी पक्षात मोठे बदल करत पक्षात मोठी उलथापालथ केली जाणार असे संकेत दिले आहेत.

तर आजी-माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. नुकताच शिंदेंनी शिवसेनेच्या राज्य विभागीय व लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. पण या घोषणेतून माजी मंत्री, आ. दीपक केसरकर यांचे नाव वगळण्यात आले असून भोंदूबाबा अशोक खरातशी जोडलेले नाव याला कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच त्यांच्या तब्येतीचे कारण असू शकते अशीही आता कुजबूज सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिवसेनेला मजबूत करण्यासाठी राज्य विभागीय व लोकसभा मतदारसंघनिहाय बदल करण्याची रणनीती आखली. याप्रमाणे संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्यांची घोषणाही केली. मुंबई-ठाण्याची सगळी सूत्रे खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिली आहेत.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar: "अशोक खरात केसरकरांचं शिक्षण खातं चालवत होता" राऊतांच्या आरोपांना केसरकरांचं उत्तर; नेमकं काय घडलं होतं? स्पष्टच सांगितलं

तर उत्तर कोकण विभागाची जबाबदारी शिंदे यांनी मंत्री भरत गोगावले तर दक्षिण कोकण विभागासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू आ. किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडाची जबाबदारी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या तर पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी आमदार दगडू सकपाळ यांना सोपविण्यात आली आहे.

आजी-माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकाचे नाव हे संपर्क प्रमुखांच्या यादीत आले असतानाच शिंदेंचे विश्वसनीय मानले जाणारे माजी मंत्री, आ. दीपक केसरकर यांना कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. यावरून आता कोकणासह राज्यभर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

तर केसरकर यांना बाहेर ठेवण्यामागे खरात प्रकरण असून खरातशी असलेले संबंध आता पक्षातंर्गत नाराजी ओढावण्याचे कारण ठरले आहे. खरात प्रकरणात केसरकर यांचे फोटो समोर आले होते. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका करत त्यांचे खरातशी संबंध काय असा सवाल उपस्थित केला होता. तर केसरकर यांनी इतर ४० भर आमदारांचे पितळ उघडे पाडावे असे आवाहन केले होते. तर खासदार संजय राऊत यांनी देखील केसरकर खोटे बोलत असून त्यांचे खरातशी संबंध असल्याचा दावा केला होता. यावरून आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

दरम्यान केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे म्हणत राजकारणातून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर ते पुन्हा निवडणूक लढत ते २०२५ ला निवडून आले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात 13 रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रमात आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत देत आपण आता पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.

या घोषणेनंतर केसरकर खरच निवृत्ती घेणार का? याचीही अनेकांना खात्री नव्हती. कारण याआधी देखील अशीच घोषणा केली होती. मात्र आता ते या मतदार संघाचे चौथ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. फरक इतकाच आहे की त्यांची तब्बेत साथ देत नसल्याचे समोर आले. तर यामुळेच त्यांनी ही घोषणा केली असावी असेही बोलले जात होते.

पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विभागीय व लोकसभा मतदारसंघनिहाय बदल करण्याचे संकेत देत संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. पण केसरकर यांना नाकारल्याचे दिसत आहे. यामागे खरात प्रकरण किंवा केसरकर यांच्या तब्बेतीचे कारण असू शकते. दरम्यान केसरकर यांची याबाबत अद्याप प्रतिक्रिया समोर आली नसून ते काय म्हणतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांना दुहेरी धक्का : होमग्राऊंड हातातून निसटले अन् नितेश राणेंनी सावंतवाडीत उभे केले नवे सत्ताकेंद्र

FAQs :

1. शिवसेनेत कोणते बदल करण्यात आले?
नवीन संपर्क प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

2. दीपक केसरकर यांचे नाव का वगळले गेले?
खरात प्रकरणाशी संबंध किंवा तब्येतीचे कारण असल्याची चर्चा आहे.

3. या बदलामागे उद्देश काय आहे?
मराठवाड्यात पक्ष मजबूत करण्यासाठी रणनीती आखली आहे.

4. कोणत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल झाले?
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल झाले.

5. या घडामोडीचा परिणाम काय होईल?
शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात आणि राज्यातील समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com