

२८ जानेवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त करत काही वरिष्ठ नेत्यांची नावे घेतली आहेत.
मंत्री भरत गोगावले यांनीही शंका व्यक्त केल्याने प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.
Raigad News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू विमान अपघातात २८ जानेवारीला झाला. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर या गोष्टीला आता जवळपास पंधरा दिवस होत येत असून या विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केले जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तसेच त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे नाव घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हा अपघात नसून घातपात असल्याची शंकाही उपस्थित केली आहे. यावरूनच एकनाथ शिंदे यांच्या मंत्री तथा रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील अशीच शंका उपस्थित केली आहे. यामुळे आता रोहित पवार यांच्या आरोपांना आणि त्यांनी केलेल्या दाव्यांना बळ मिळताना दिसत आहे.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना गंभीर आरोप केले. त्यांनी, दादा विलिनीकरणाची घोषणा करणार होते. मात्र आज ते आपल्यात नाहीत. त्यामुळे विलिनीकरणावर बोलणं महत्वाचे नाही. त्यामुळे मी दादांच्या विमान अपघाताबद्दल आवज उठवत आहे. याबाबत मोठ्या नेत्यांची वेळ मागितली.
पण ती वेळ मिळालेली नाही. दादांच्या विमान अपघाताची योग्य पद्धतीने चौकशी होत नाही, याची खंत वाटतेय. याबाबत १२ तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो. पण त्यात कोण कोणासोबत जाणार होतं, याची उत्तरं आहेत. सत्तेत जायचं असतं तर आम्ही कधीच गेलो असतो. सोमवार किंवा मंगळवारी याबाबत मी पत्रकार परिषद घेणार असेही त्यांनी म्हटलं.
तसेच यावेळी त्यांनी, अजितदादांना एकटं पाडलं जात होतं, ते याबाबत अनेकदा आमच्याशी बोलले. अपघाताच्या एक दिवस आधीही फाईलवर सही झाली पाहिजे, म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळेच दादांना उशीर झाला आणि त्यांना विमान बूक करावे लागले. अन्यथा ते आज आपल्याबरोबर असते.
आता त्यावेळी प्रफुल्ल पटेलचं म्हणाले होते. त्यांचे आणि दादांचे फोनवर बोलणं झाले होते. त्यांनीच एका फाईलसाठी फोन केला होता. त्यांच्यामुळेच दादांना निघण्यास उशीर झाल्याचे प्रमोद हिंदूराव म्हणालेत.
तर २७ तारखेला तटकरे साहेब स्वतः उशिरापर्यंत दादांसोबत थांबलेले होते. हे देखील आता समोर येत असून नरेश अरोरांच्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट रद्द होवू नये म्हणून वाद झाला होता. या वादावेळी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल येथे होते. यामुळे आता असं वाटतं की दोन गोष्टी खऱ्या असतील तर तिसरीही गोष्ट खरी असावी, असेही त्यांनी म्हटलं आहे.
याचवेळी गोगावले यांना रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. पत्रकारांनी तुम्ही आणि तटकरे एकचा जिल्ह्यातले असून आपण त्यांना ओळखता. यावर गोगावले यांनी, या गोष्टींवर सध्या आम्ही बोलणार नाही. रोहित पवार चांगले बोलत आहेत. त्यामुळे सध्या या बाबत आम्ही काहीच बोलणार नाही.
यानंतर पत्रकारांनी पुन्हा एकदा त्यांना अजित पवार यांच्या विमान अपघात हा घातपात असल्याचा होणाऱ्या दाव्याबाबत विचारले असता त्यांनी आपण या दाव्यांच्या बाबत काही अंशी सहमत असून सगळ्याच नाही असे स्पष्ट बोलले आहेत. यामुळे आता रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आणि दाव्यांना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते देखील बळ देताना दिसत आहेत.
1. अजित पवार यांचा मृत्यू कधी झाला?
२८ जानेवारी रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
2. रोहित पवार यांनी काय आरोप केले आहेत?
हा अपघात नसून घातपात असू शकतो, अशी शंका व्यक्त करत त्यांनी काही वरिष्ठ नेत्यांची नावे घेतली आहेत.
3. कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत?
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे चर्चेत आहेत.
4. या प्रकरणावर इतर नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे?
मंत्री भरत गोगावले यांनीही शंका उपस्थित केली आहे.
5. या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू आहे का?
अपघाताच्या कारणांबाबत तपास प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती येणे अपेक्षित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.