Rajapur News : राजापूरमधील नेत्यानेही सोडली ठाकरेंची साथ; सामंतांच्या उपस्थितीत केला शिंदे गटात प्रवेश

अणसुरेचे माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर यांच्यासह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केलेला असताना आता माजी बांधकाम सभापती नारकर यांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.
Ajit Narkar joins Shinde Group
Ajit Narkar joins Shinde GroupSarkarnama
Published on
Updated on

राजापूर/रत्नागिरी : शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अजित नारकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत पडवे गावचे गावप्रमुख दत्ताराम ठुकरूल, पडवेच्या सरपंच रूची बाणे, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. (Former Ratnagiri ZP Sabhapati Ajit Narkar joins Shinde Group)

दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील डिंगणीचे सरपंच समिरा अ. मजीद खान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अजीम उमर खान, अर्पिता मंगेश काष्टे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनीही सिंधुरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समितीचे सदस्य किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Ajit Narkar joins Shinde Group
Assembly Session : बिनासहीचं पत्र आलं की, आपण ओळखायचं की अजिदादाचं पत्र आलंय : शिंदेंनी उघड केले गुपित

शिवसेनेचे राजापूर तालुकाप्रमुख अशफाक हाजू यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी येथे पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश झाला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित व उद्योजक आणि शिवसेनेचे रत्नागिरीतील नेते किरण सामंत यांनी स्वागत केले.

अणसुरेचे माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर यांच्यासह अनेकांनी शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केलेला असताना आता सागवे जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती नारकर यांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

Ajit Narkar joins Shinde Group
Eknath Shinde News : 'आम्ही घटनाबाह्य सरकार, तर मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का?'; शिंदेंचा अजित पवारांना सवाल

त्यांच्यासमवेत आनंद बापट, अमित दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य स्वाती तांबे, यशवंत तांबे, जगन्नाथ वतांबे, श्रीराम मेस्त्री, बाळकृष्ण तांबे, स्वप्नील तांबे, ओंकार अवसरे यांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याची माहिती शिंदे गटाचे तालुकाप्रमुख हाजू यांनी दिली. या सर्व प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाणार असून, भविष्यामध्ये पडवे गावच्या विकासासाठी आवश्यक तो निधी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मिळवून दिला जाईल, असेही हाजू यांनी आश्‍वासित केले.

डिंगणीत मोठी राजकीय उलथापालथ

राजापूर अर्बन बँकेचे संचालक, शिरगाव (रत्नागिरी) ग्रामपंचायत सदस्य अल्ताफ संगमेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली संगमेश्वर तालुक्यातील डिंगणीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. डिंगणी सरपंच समिरा अ. मजीद खान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अजीम उमर खान, अर्पिता मंगेश काष्टे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी आज सिंधुरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Ajit Narkar joins Shinde Group
Fadnavis-Shinde On Ajit Pawar : ‘अजितदादांना सहशिवसेनाप्रमुख करा...’: शिंदे-फडणवीसांनी विधानसभेत घेतली पवारांची फिरकी

गेल्या काही दिवसांपासून अल्ताफ संगमेश्वर यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आणि डिंगणी ग्रामपंचायत शिंदे शिवसेनेकडे आली आहे. विशाल कदम, भगवान खाडे, नीता कदम, वसंत राऊत, अनिल कदम, मुनिरा पावसकर, हसिना खान, मैनुद्दीन वागले, फहीम जुवळे, आरबाज खान, चंद्रकांत कदम, अमित गमरे, सुनील कदम, नागचंद कदम, अफसर मिरकर, निहाल मिरकर, सोहेल सय्यद, सफिर शाह, उदय जोगले, सुनीता कदम, रमेश मोहिते, दिलीप कदम, सरिता कदम, रेश्मा मोहिते आदींनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com