

Gopichand Padalkar News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंब आणि महाविकास आघाडीवर टीकेची एकही संधी सोडत नाही. मात्र, आता पडळकर यांनी मोठा गौप्यस्फोट करतानाच शिंदे गटातील विद्यमान आमदाराच्या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे शिंदे गट भाजपची राजकीय गणितं बिघडणार असल्याचं चित्र आहे.
गोपीचंद पडळकर खानापूर तालुक्यातील मोही इथे कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी 2024 साली खानापूर आटपाडी मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल असा गौप्यस्फोट केला आहे. हा मतदारसंघ सध्या शिंदे गटाकडे आहे. तिथे अनिल बाबर हे विद्यमान आमदार आहेत. आता त्या मतदारसंघावर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दावा ठोकल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
पडळकर म्हणाले, आपण 2019 ला बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत होतो. त्यावेळी बारामती क्लब हाऊसला आपल्याला भेटायला अनिल बाबर आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र अमोल बाबर आले होते. आणि त्यांनी आमची ही शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही आम्हाला मदत करा. २०२४ मध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो असा शब्द मला दिला होता. त्यामुळे २०२४ ला अनिल बाबर निवडणूक लढवणार नाहीत. त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता आणि आमचे पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी देखील याची नक्कीच दखल घेतील असं आमदार पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळेच २०१९ मध्ये अनिल बाबर हे आमदार झाले असल्याचंही सांगितलं. तसेच आतापर्यंत ही गोष्टी आपण सांगितली नाही. कारण ते या गोष्टी सांगतील असं वाटलं होतं. पण ते सांगायला तयार नाहीत. यामुळे आपण मतदारसंघातील लोकांना बारामती येथील बाबर यांच्यासोबतच्या बैठकीत काय झालं हे सांगायला हवं म्हणून सांगितलं आहे असही पडळकर यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.