BJP Ex MLA Resignation : भाजपला धक्का : अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच माजी आमदाराचा सर्व पदांचा राजीनामा; प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवत केला मोठा दावा

Former MLA Narendra Pawar Case : तरुणीला शस्त्राचा धाक दाखवत तिला दारू पाजून भाजपच्या माजी आमदाराने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.
kalyan west Ex MLA narendra pawar resigns bjp posts
kalyan west Ex MLA narendra pawar resigns bjp postssarkarnama
Published on
Updated on

Kalyan Crime News : कल्याण शहरातील एका २२ वर्षीय विवाहित तरुणीने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पडघा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असतानाच माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना पत्र पाठवत राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.

कल्याण शहरातील पीडित तरुणीचा पतीसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तिला आपल्या कार्यालयात बोलावले होते. तर १३ सप्टेंबर रोजी पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांनी पीडित तरुणी भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेले. तेथे तिला शस्त्राचा धाक दाखवत दारू पाजवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे.

दरम्यान आता कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवत आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती त्यांनी केली आहे. नरेंद्र पवार हे भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावरही कार्यरत होते.

kalyan west Ex MLA narendra pawar resigns bjp posts
Bhiwandi Crime News : भिवंडीत भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल; दारू पाजून अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप

त्यांच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे. तसेच आपल्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा खोटा असून आपली बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा देखील नरेंद्र पवार यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

kalyan west Ex MLA narendra pawar resigns bjp posts
Crime News : धक्कादायक! पोलिसानेच भररस्त्यात कढली महिलेची छेड, पाठलाग करत अश्लील कमेंट...; बहिणीने शूट केला व्हिडिओ

तसेच या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी आपण पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी या पत्रात दिले आहे. तर या राजीनाम्याने कल्याण परिसरात खळबळ उडाली असून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com