Uddhav Thackeray Setback : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीसह, सरपंच, कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत!

Uddhav Thackeray Eknath Shinde : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.
Former Zilla Parishad chairman Narhari Wagh joins Eknath Shinde's Shiv Sena, in a setback for Uddhav Thackeray.
Former Zilla Parishad chairman Narhari Wagh joins Eknath Shinde's Shiv Sena, in a setback for Uddhav Thackeray.sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे,यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यानच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.

नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे विविध जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला, अशी पोस्ट एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटवरून शेअर केली आहे.

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरहरी वाघ, नालेश्वरचे सरपंच रुपेश वाघ, पिंपळगावचे माजी सरपंच नागेश बंडवणे, ग्रामपंचायत सदस्य बळीराम भोसले, ग्रामपंचायत सदस्य बाळाजी इंगोले, कपिल पाटील, बाबुराव वाघ, बळराम वाघ, बालाजी दत्ता भारती आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागा

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाले. त्यांनी यावेळी सांगितले की, 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक शिवसेना पक्षात दाखल होत आहेत. शंकरअण्णा धोंडगे यांच्या प्रयत्नातून लोहा येथे पक्षाचा मेळावा संपन्न झाला होता, तेव्हाही हजारो लोकांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता. बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांचा पक्षप्रवेश होत असून, आपल्या सर्वांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. यापुढे प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची असून त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे.

Former Zilla Parishad chairman Narhari Wagh joins Eknath Shinde's Shiv Sena, in a setback for Uddhav Thackeray.
Uddhav Thackeray Shiv Sena : 'खाऊसाहेब' म्हणत ठाकरेंनी केली होती आगपाखड; आता खासदार वाकचौरेंचा पलटवार, शिवसेना ठाकरे पक्षाला मोठे खिंडार

सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेते

राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत नांदेडमधील जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बालाजी आळंदीकर, ज्येष्ठ नेते किशोर पुंडलिक महाराज, युवा नेते पंकज तंतरपाळे, नायगाव मतदारसंघाचे नेते गजानन चव्हाण, लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक राचुरे, युवा नेते शुभम लाकडे यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Former Zilla Parishad chairman Narhari Wagh joins Eknath Shinde's Shiv Sena, in a setback for Uddhav Thackeray.
Uddhav Thackeray Setback : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तब्बल 12 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला? 5 कोटी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com