Shivsena UBT Setback : ठाकरे गटाला मोठा धक्का! असंतोषाचा स्फोट; निष्ठावंत शिवसैनिकांचे राजीनामे, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

uddhav thackeray konkan shivsena split : कोकण हा शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला असतानाही वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेत्यांमध्ये सुसंवाद नसल्याने सामान्य पदाधिकारी हतबल झाला आहे.
Shivsena Politics; Uddhav Thackeray
Shivsena Politics; Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कोकणात ठाकरे सेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात राजीनामे

  2. गटबाजी आणि विसंवादामुळे पक्षांतर्गत फूट स्पष्ट

  3. अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला

Ratnagiri News : कधी काळी कोकण हा शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. आता तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होताना दिसत आहे. याला कारण पक्षातील राज्य पातळीवरील नेत्यांचे कोकणाकडे होणारे दुर्लक्ष असून स्थानिक नेते त्यांच्याती विसंवाद कारण ठरत आहे. आता याविसंवादाचा परिणाम स्थानिक पातळी पक्ष फुटीने दिसत आहे. नुकताच राज्य विस्तारक आणि युवा संघटनेचे तालुका अधिकाऱ्यासह तालुकाप्रमुखाचा राजीनामा पडला. तर या दोघांनी पक्ष सोडण्याचे कारण हे संघटनेती गटबाजीचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

उबाठा शिवसेनेचे राज्य विस्तारक आणि युवा संघटनेचे तालुका अधिकारी उमेश खताते यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला आहे. तर खेड ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता भिलारे यांच्यासह भिलारे आयनी व साखरोली गावातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेना सोडली आहे. तसेच या दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीसह आता झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्याच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट झाली आहे. कोकणात मजबूत असणारा पक्ष स्थानिक पातळीवर नेतृत्वामुळे आता कमजोर झाला आहे. पक्षाकडे कार्यकर्त्यांची फौज आहे पण लढाई लढायला नेतृत्व नाही आणि जे नेतृत्व आहे ते संघटनेती गटबाजीच्या राजकारणामुळे नाराज झाले आहे.

Shivsena Politics; Uddhav Thackeray
Shivsena UBT Setback : ठाकरे गटाला मोठा धक्का! असंतोषाचा स्फोट, निष्ठावंत शिवसैनिकांची शिंदेंच्या शिवसेनेकडे धाव

आता ही नाराजी राजीनाम्यातून दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील शिवसेना नेते राज्य विस्तारक आणि युवा संघटनेचे तालुका अधिकारी उमेश खताते यांनी आपल्या सदस्य व सर्व पदांचा राजीनामा देत 'जय महाराष्ट्र' केला आहे. तसेच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष प्रवेश मुंबई होणार आहे.

नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत खताते हे उबाठा सेनेकडून खेर्डी पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात होते. मात्र त्यांचा पराभव झाला. दरम्यान त्यांनी वरिष्ठांकडून तालुक्यातील संघटना व पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा केला. तसेच नेत्यांमधील दुफळी, गटबाजीचे राजकारणामुळेच तालुक्यातील संघटना खिळखिळी होत आहे.

अशामुळे सर्वसामान्य जनतेची कामे करणे अशक्य झाले असून पदाधिकाऱ्यांना बळ व न्याय देणे गरजेचे आहे. पण ते संघटनेच्या माध्यमातून बळ व न्याय दिला जात नाही. फक्त गटबाजीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेत्यांमध्ये सुसंवाद नसल्याने सामान्य पदाधिकारी हतबल झाला आहे, अशी आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान खेड ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता भिलारे यांनी देखील शिवसेनेला अखेरचा दंडवत घालत शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भिलारे यांच्यासह भिलारे आयनी व साखरोली गावातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. याप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Shivsena Politics; Uddhav Thackeray
Shivsena UBT News : कृष्णा पाटील डोणगावकर छुपा रुस्तम, पदासाठी त्यांनीच गद्दारी केली, अंबादास दानवेंची पाठराखण करत संजय निकम यांनी तोफ डागली!

FAQs :

1. कोकणात काय घडले आहे?
ठाकरे सेनेतील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे

2. नेत्यांनी पक्ष का सोडला?
पक्षातील गटबाजी आणि विसंवाद हे मुख्य कारण सांगितले आहे

3. कोणत्या गटात प्रवेश केला आहे?
नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे

4. याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे

5. कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत?
उमेश खताते आणि दत्ता भिलारे यांची नावे चर्चेत आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com