ZP Election Result : गोगावलेंचा वारस ठरला गेमचेंजर! रायगडात विकासची धडाकेबाज एंट्री, तटकरेंना धक्का

Raigad ZP Result 2026 : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेंचा विजय झाला असून या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
Raigad ZP Election Politics; sunil tatkare, bharat gogawale And vikas gogawale
Raigad ZP Election Politics; sunil tatkare, bharat gogawale And vikas gogawalesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • महाड राडा प्रकरणात जामीनावर असलेले विकास गोगावले यांनी निवडणुकीत विजय मिळवला.

  • या निकालामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

  • विजयानंतर महाडमध्ये गोगावले समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

Raigad Zilla Parishad Election Results: महाड राडा प्रकरणात जामीनावर असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांच्या या विजयामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान महाड राडा प्रकरणात झालेल्या आरोपानंतरही विजयी गुलाल लागल्याने ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याने आपला विजय झाल्याची प्रतिक्रिया विकास गोगावले यांनी व्यक्त केली आहे. तर या विजयानंतर गोगावले यांच्या समर्थकांनी गुलाल उधळ एकच जल्लोष केला. सध्या महाडमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला होता. या राड्या प्रकरणात एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ज्यानंतर हे सर्वजण फरार झाले होते. पण त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारला झापले होते. तसेच गोगावलेंना थेट बजावत मुलगा विकास याला हजर करण्याच्या आदेश दिले होते. ज्यानंतर विकास गोगावलेंसह ६ जण महाड पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता.

झालेल्या राड्यानंतर विकास गोगावले पोलिसांना सापडत नव्हते. यावरून उच्च न्यायालायने राज्य सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. मंत्र्यांचे पसार असलेले पुत्र, गुन्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहातात. मात्र पोलिसांना सापड नाहीत? अशा शब्दात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. यानंतर विकास गोगावले पोलिसांसमोर आज हजर झाले आहेत.

Raigad ZP Election Politics; sunil tatkare, bharat gogawale And vikas gogawale
ZP Elections Result : जिल्हा परिषद निकालाच्या आधी ही आकडेवारी पाहून घ्या, कोणाकडे होत्या सर्वाधिक जागा? आज धक्कादायक निकाल...

दरम्यान आता झालेल्या महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी मतदारसंघाच्या निवडणुकीत विकास गोगावले यांचा विजय झाला आहे. विकास गोगावलेंनी प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत विजय मिळवला. विकास गोगावले यांचा विजय होताच गोगावले यांच्या समर्थकांनी गुलाल उधळ एकच जल्लोष केला. सध्या महाडमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Raigad ZP Election Politics; sunil tatkare, bharat gogawale And vikas gogawale
ZP Election Results 2026 : निकाल जाहीर होण्याआधीच झेडपी आणि पंचायत समितीच्या 'या' 27 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी, पाहा संपूर्ण यादी

या निकालानंतर भरत गोगावले यांनी, हा जनतेचा विजय असल्याचे सांगत केलेल्या कामाची जनतेनं पोच पावती दिल्याचे सांगितले. तसेच हा विजय कार्यकर्त्यांचा असून जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारतोय. जे काम करतोय त्यामुळे जनतेने स्विकारले आहे.

तर जो पर्यंत भरतशेठची नियत आणि नीतीमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, हा माझा दावा होता. गोरगरिब जरी आला तरी तो आपला मतदार असतो, सहकार्य करणारा असतो. त्याचा अवमान करणे आपल्याला शक्य नाही. जरी काही झालं तरी आम्ही त्याच्या पाठीमागे असतो. त्याचा मोबदला जनतेने मला दिला आहे," असेही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

FAQs :

1. विकास गोगावले कोण आहेत?
विकास गोगावले हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव आहेत.

2. महाड राडा प्रकरण काय आहे?
महाडमध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणाला महाड राडा प्रकरण म्हणून ओळखले जाते.

3. आरोप असूनही विकास गोगावले कसे विजयी झाले?
जनतेने आरोपांपेक्षा नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदान केल्याचे गोगावले यांनी सांगितले.

4. या निकालाचा सुनील तटकरे यांच्यावर काय परिणाम झाला?
रायगडमधील राजकीय प्रभावाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

5. विजयानंतर महाडमध्ये वातावरण कसे आहे?
सध्या महाडमध्ये आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com