crop compensation GR : राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवकाळीने झोडपलेल्या शेतीला नुकसान भरपाई जाहीर

Maharastra Government On Raigad and Sindhudurg Crop Loss : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे कोकणात काजू, अंबा, धान पिकासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
Raigad and Sindhudurg Crop Loss
Raigad and Sindhudurg Crop Losssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाराष्ट्र मधील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

  2. कांदा, गहू, हरभरा, मका, धान तसेच कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाले असून कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे.

  3. राज्य सरकारने नोव्हेंबर २५ ते डिसेंबर २५ दरम्यानच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असून रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे.

Raigad/Sindhudurg News : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे विशेषतः कांदा गहू, हरभरा, मका आणि धानासह कोकणात आंबा, काजू पिकांना फटका बसला आहे. त्यातच कर्ज माफीची मागणी होत असतानाही मागिल वर्षात झालेल्या अवकाळीची मदत अद्याप मिळालेली नाही.

यावरूनच राज्यातला शेतकरी आणि विरोध पक्ष संतापले असून कर्ज माफीची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणी दरम्यान राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अर्थ संकल्पाच्या दुसर्‍या दिवशी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. ही मदत रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून माहे नोव्हेंबर २५ ते डिसेंबर २५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीसाठी असेल.

राज्यातील विविध भागांना रविवारी (ता.२२) आणि सोमवारी (ता.२३) अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रायगड सह तळकोकणातील एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून कोकणात फळ बागांचे नुकसान झाले आहे. सध्या आंबा आणि काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना अवकाळी पावसासह पडणाऱ्या धुक्यामुळे फळांची गळ होण्याची शक्यता आहे.

Raigad and Sindhudurg Crop Loss
Crop Loss Compensation : अन्नदात्यावर दुहेरी संकट: अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर आता मदतीसाठी e-KYCचा अडथळा, 11 लाख शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात?

त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती आहे. आधीच मागील वर्षात अवकाळीने झालेले नुकसान भरून निघालेले नाही. तोच आता या अस्मानी संकटामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. अवकाळी पावसाने काजू, आंबा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून बागायतदारांची चिंता वाढली आहे.

याचदरम्यान रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महायुतीच्या सरकारने अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी माहे नोव्हेंबर २५ ते डिसेंबर २५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. याबाबत शासन निर्णय काढण्यात आलाय.

यात माहे नोव्हेंबर २५ ते डिसेंबर २५ या महिन्यात राज्यातील कोकण विभागातील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत देण्याकरीत ६४ लाख ७० हजारांचा निधी मंजूर केल्याचे म्हटलं आहे. तसेच या निधीला वितरीत करण्याची शासन मंजूरी देण्यात आल्याचेही म्हटलं आहे. हा निधी थेट DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

दरम्यान हा निधी वितरीत करताना शासनाने काही थेट सुचना केल्या असून लाभ देताना लाभार्थी दुबार होणार नाही याची काळजी तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने काळजी घ्यावी असे म्हटले आहे. तसेच ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीबाबत नमुद केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता होते की नाही याची देखील खात्री करावी असेही म्हटले आहे. तर मदत दिल्या नंतर लाभार्थ्यांची यादी तपशीलासह जिल्हा संकेत स्थळावर प्रसिद्ध करावे असेही बंधन घालण्यात आले आहे.

Raigad and Sindhudurg Crop Loss
Crop Damage Compensation : 54 लाख शेतकरी मदतीपासून राहू शकतात वंचित; तातडीने करून घ्या ही प्रोसेस

FAQs :

1. कोणत्या भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे?
विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग प्रभावित झाले आहेत.

2. कोणत्या पिकांचे नुकसान झाले आहे?
कांदा, गहू, हरभरा, मका, धान तसेच आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाले आहे.

3. शेतकऱ्यांची मुख्य मागणी काय आहे?
कर्जमाफी आणि नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे.

4. सरकारने कोणता निर्णय घेतला आहे?
नोव्हेंबर २५ ते डिसेंबर २५ दरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

5. कोणत्या जिल्ह्यांना विशेष दिलासा मिळाला आहे?
रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com