Tatkare Family join BJP : 'तटकरे कुटुंब भाजपमध्ये जाणार होतं'; सत्ताधारी आमदाराच्या दाव्याने रायगडच्या राजकारणात भूकंप!

Mahendra Dalvi Statement on Aniket Tatkare and Tatkare Family Over BJP Entry : गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या राजकारणात संघर्षाला उकळी फुटली असून, पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध दळवी राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.
Tatkare Family
Tatkare Familysarkarnama
Published on
Updated on

Raigad Political Row News : पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतरही रायगडच्या राजकारणातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू असणाऱ्या राष्ट्रवादी-शिवसेनेतील वादाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे. पुन्हा एकदा आमदार महेंद्र दळवी यांनी आमदार अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

दळवी यांनी कोकण विधानपरिषद निवडणुकीवरून तटकरेंवर थेट निशाणा साधला आहे. तर तटकरे कुटुंब भाजपमध्ये जाणार होतं, असा दावा केला आहे. या दाव्यामुळे रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली असून, महायुतीतील अंतर्गत राजकीय वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. तर राष्ट्रवादी पक्ष किंवा तटकरे कुटुंबीयांकडून यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

रायगड जिल्ह्यातील पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सरोगसी बाळावरून सुरू झालेला वाद आणखी वाढला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. याआधीच या शब्दावरून अनिकेत तटकरे यांनी पलटवार करत तो अचूक लिहून दाखवावा, असे आव्हान दिले होते.

Tatkare Family
Raigad Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, कर्जत-खालापूर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले; तटकरेंची फडणवीसांना 'फोनाफोनी'

आता दळवी यांनी, भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत 'सरोगसी बाळ' जन्माला आले. अनिकेत तटकरेंनी 'सरोगसी बाळ' म्हणजे काय, हे आधी त्यांच्या बापाला विचारावे. यानंतर तटकरेंनी अशी किती सरोगसी बाळे जन्माला घातली आणि वाऱ्यावर सोडून दिली, हे देखील कळेल," अशा अत्यंत तीव्र शब्दांत उत्तर दिलं आहे.

नेहमीप्रमाणे सगळं आपल्या घरातच पाहिजे, असा तटकरेंचा स्थायी स्वभाव आहे. आज जर अजित पवार असते, तर त्यांनी सुनील तटकरेंना पक्षाबाहेर काढलं असतं, असाही दावा दळवी यांनी करताना तटकरे कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करणार होतं, असेही दळवी म्हणाले.

Tatkare Family
Raigad Politics : तटकरेचं स्थान डळमळीत झालंय; शिवसेना ठाकरेंच्या नेत्याच्या प्रवेशानंतर शिंदेंचा शिलेदार भडकला

"त्यांनी स्वतःच्या मुलाला सोडून पक्षातील एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार केलं असतं, तर आम्हालाही आनंद झाला असता. आणि ती स्व. अजितदादांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरली असती," असाही टोला दळवींनी तटकरेंच्या घराणेशाहीवर प्रहार करत लगावला आहे. दरम्यान, आता या नव्या मुद्द्यावरून रायगडसह राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा महेंद्र दळवी विरुद्ध अनिकेत तटकरे असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com