Maharashtra Politics : तटकरेंविरोधात दंड थोपटले, गोगावलेंना ‘गिअर बदला’ म्हणत दळवींकडून आपल्याच वक्तव्यावर खंत; ‘त्यांना उदंड आयुष्य लाभो’

Mahendra Dalvi Targets Sunil Tatkare : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत रायगडच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.
Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvi
Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvisarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad Political News : राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला पोहोचले आहेत. पालकमंत्रिपदावरून सुरू असलेली धुसफूस काही प्रमाणात कमी झाली असली, तरी खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील संघर्ष कायम आहे.

पालकमंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून तटकरे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यातच रोह्यातील पक्षप्रवेश सोहळ्यात दळवींनी स्थानिक राजकारणात वेगळी भूमिका घेण्याचे संकेत देत तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे आगामी काळात रायगडमध्ये शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

रोह्यातील पक्षप्रवेश सोहळ्याबाबत बोलताना दळवींनी हा कार्यक्रम सुनील तटकरे यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. ‘तटकरे यांच्या नावावर टिच्चून पक्षप्रवेश केला असून रोह्याचा हिशेब चुकता करायचा आहे,’ असे ते म्हणाले. माणगाव आणि श्रीवर्धनमधील पक्षप्रवेशानंतर आपल्यावर वरिष्ठांकडून दबाव येत असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुतीचा धर्म पाळण्याच्या नावाखाली फोन येतील, विनंत्या होतील.

Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvi
Maharashtra Politics Update : 'अजितदादांच्या निधनानं विकासाचा दृष्टिकोन असलेला महत्त्वाचा लोकनेता गमावला..'; अमित शाह

मात्र वरिष्ठांचे आदेश पाळतानाच स्थानिक राजकारणात आपला गिअर बदलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मी वेगळ्या मार्गाने चाललो आहे, भरतशेठ तुम्हीही गिअर बदला,’ असे आवाहन त्यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांना केले. गोगावले यांना पालकमंत्री बनवण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्याचा दावाही दळवींनी केला.

तटकरे कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वावर टीका करताना दळवींनी अनेक गंभीर आरोप केले. ‘या कुटुंबावर विश्वास ठेवू नका, त्यांच्या सावलीलाही उभे राहू नका,’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. रोह्यातील नामकरणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी तटकरे यांना लक्ष्य केले. शहरातील अनेक ठिकाणी तटकरे कुटुंबाचेच नाव दिसत असल्याची टीका करत त्यांनी गटारांनाही तटकरे यांचे नाव द्या, असा उपरोधिक टोला लगावला. हजारो कोटी रुपयांचा सीएसआर निधी नेमका कुठे खर्च होतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अनिकेत तटकरे यांच्या राजकीय भवितव्याबाबतही त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली.

दरम्यान, माणगाव येथील प्रवेश सोहळ्यात तटकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दळवींनी आता खंत व्यक्त केली. सुनील तटकरे यांना शंभर वर्षांचे आयुष्य लाभो, असे ते म्हणाले. मात्र, अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला तटकरे उपस्थित राहिले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पुन्हा टीका केली. ‘आजचा दिवस राष्ट्रवादीसाठी काळा दिवस,’ असे विधानही त्यांनी केले. तटकरे यांच्याबाबत शंभर अपराध पूर्ण झाल्याचा आरोप करत आता त्यांना घरी बसावे लागेल, असेही दळवी म्हणाले.

Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvi
Shivsena MLA Mahendra Dalvi : पैशांनी भरलेली बॅग… नोटांची मोजणी! दानवे यांच्या ‘कॅश बॉम्ब’चा स्फोट होताच, दळवींचे खुले आव्हान, म्हणाले, ‘...तर मी राजीनामा!‘

‘आमदार आणि खासदार बदलणार असून तटकरे कुटुंबाला जिल्ह्याबाहेर हद्दपार करणार,’ असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. तटकरे कुटुंबाला बाजूला ठेवून नवी राजकीय आघाडी उभारण्याचा पॅटर्न असेल, असेही त्यांनी सूचित केले. रायगडचा खासदार शिवसेनेचाच करण्याचा निर्धार आणि श्रीवर्धनमध्ये पक्षाचा विस्तार करण्याचे संकेत त्यांनी यापूर्वी दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील महायुतीचे राजकीय गणित बदलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.