

म्हसळा नगर पंचायतीतील सात नगरसेवकांना पक्षादेश उल्लंघन केल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा राजकीय फटका बसला.
या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Raigad political News : रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘साहेब’ विरुद्ध ‘शेठ’ असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. म्हसळा नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करून पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या म्हसळा नगर पंचायतीतील सात नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फटका बसल्याचे बोलले जात आहे. तसेच तटकरे यांनी राजकीय मास्टरट्रोक मारला असून गोगावलेंना धोबी पछाड दिल्याचेही चर्चा रंगली आहे.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांना फोडत मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेता भगवा म्हसळा नगर पंचायतीवर फडकवला होता. या पक्षांतरामुळे म्हसळ्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसला होता. मात्र, सुनील तटकरे यांनी कायदेशीर लढाई लढत या नगरसेवकांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या सुनावणीत अखेर तटकरेंच्या रणनीतीचा विजय झाला आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचे बळ घटले आहे.
पद रद्द करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ‘महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६’ मधील कलम ३(२) आणि १९८७ च्या नियम ८(१) मधील तरतुदींनुसार हा निकाल दिला. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्याने शिवसेनेच्या या सर्व सातही सदस्यांचे पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अलिबाग येथे २७ जानेवारीला झालेल्या या निर्णयामुळे म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड पुन्हा घट्ट झाली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल आल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दुसरीकडे, मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटासाठी हा निर्णय मोठा मानहानिकारक पराभव मानला जात आहे. म्हसळा तालुक्यात उभे राहिलेले शिंदे गटाचे बळ एका झटक्यात कमी झाले असून, आगामी निवडणुकांमध्ये या निकालाचा थेट परिणाम दिसून येणार आहे. एकूणच, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे रायगडच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अपात्र ठरलेले नगरसेवक
१) कमल रवींद्र जाधव
२) मेहजबिन नदीम दळवी
३) असलह असलम कादिरी
४) फरहीन अ. अजीज बशारद
५) सुमैया कासम आमदानी
६) सारा अ. कादीर म्हसलाई
७) शाहिद सईद जंजिरकर
FAQs :
Q1. म्हसळा नगर पंचायतीतील नगरसेवक अपात्र का ठरले?
👉 पक्षादेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले.
Q2. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी कोणता निर्णय घेतला?
👉 जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सात नगरसेवकांना अपात्र ठरवले.
Q3. या निर्णयाचा शिंदे गटावर काय परिणाम झाला?
👉 शिंदे गटाला रायगड जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला.
Q4. या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल का?
👉 राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो.
Q5. रायगडच्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल?
👉 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.