Maharashtra Politics : "एकनाथ शिंदे यांना संपवायला जात असशील, तर तू स्वतःच संपशील" : जरांगेंच्या आरोपांवर रामदास कदम चांगलेच भडकले

Manoj Jarange Patil vs Ramdas Kadam Political Row : एकीकडे जरांगे यांनी गंभीर आरोप केले आहेत, तर दुसरीकडे कदम यांनी त्यांच्यावर प्रत्यारोप होताना दिसत आहे.
₹500 Crore Claim; Manoj Jarange Patil And Eknath Shinde
₹500 Crore Claim; Manoj Jarange Patil And Eknath Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कथित ५०० कोटी रुपयांच्या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नारायण गडावरील दसरा मेळाव्यात जरांगे यांनी शिंदे यांच्याबाबत गंभीर दावा केला. या आरोपानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जरांगे विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

जरांगेंचा शिंदेंवर ५०० कोटींचा आरोप

नारायण गडावरील दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने अधिक संघटित आणि मजबूत होण्याचे आवाहन केले. याच भाषणादरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत गंभीर आरोप केला. शिंदे यांनी आपल्या नावाचा वापर करून भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा दावा जरांगे यांनी केला. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात किंवा अन्य माध्यमातून खुलासा करावा, अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे.

रामदास कदमांचा जरांगेंवर पलटवार

शिवसेना नेते रामदास कदम यांनी या आरोपावर आक्षेप घेत जरांगे यांच्यावर बदनामी केल्याचा आरोप केला. तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. कदम यांनी जरांगे यांना उद्देशून, “तू कोणाची बदनामी करत आहेस आणि कोणाकडून सुपारी घेतलीस?” असा सवाल उपस्थित केला. जरांगे यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठा समाजाने जरांगे यांना न्यायाच्या मागणीसाठी पाठिंबा दिला; मात्र ते या पाठिंब्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही कदम यांनी केला.

₹500 Crore Claim; Manoj Jarange Patil And Eknath Shinde
Maharashtra Politics : सुनेत्रा पवारांचे भाषण, CM फडणवीसांचा जयंत पाटलांशी कुजबुज अन् थेट शरद पवारांशी संवाद! राजकीय चर्चांना उधाण

‘...तर स्वतःच संपशील’

रामदास कदम यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर टीका करताना इशाराही देत जर तू एकनाथ शिंदे यांना संपवायला जात असशील, तर तू स्वतःच संपशील, असे म्हटलं आहे. याशिवाय, जरांगे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करताना कदम यांनी त्यांची मालमत्ता कुठे आहे, कोणाच्या नावावर आहे आणि नातेवाईकांच्या नावावर किती संपत्ती आहे, याची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.

तर ५०० कोटींचा आरोप करतोय, बाप दाखव आणि श्राद्ध घाल, असे म्हणत त्यांनी जरांगे यांच्या आरोपांवर पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यावरूनही त्यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. कदम यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे.

₹500 Crore Claim; Manoj Jarange Patil And Eknath Shinde
Manoj Jarange Patil : एकनाथ शिंदेंनी 500 कोटी घेतल्याच्या जरांगेंच्या आरोपावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं...

आधीपासूनच शाब्दिक संघर्ष सुरू

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करण्याच्या त्यांच्या शैलीवरूनही भाजप आणि शिवसेना मधील काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आता त्यांनी शिंदे यांच्याबाबत केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या दाव्यामुळे हा वाद नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com