Election controversy : मतमोजणीला धक्का! मतदान यंत्र–नोंदणीत मतांचं ‘मिसमॅच’! प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये, पाच कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

Sindhudurg ZP election controversy : नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणीवेळी दोडामार्ग तालुक्यातील एका मतदारसंघात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे.
Election officials verify voter lists in Pune district after the Election Commission flagged over 67,000 duplicate voters ahead of Zilla Parishad elections.
Election officials verify duplicate voters ahead of Zilla Parishad elections.Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. माटणे मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर नोंदवलेल्या मतांची संख्या आणि मतदान यंत्रावरील मतांची संख्या यामध्ये तफावत आढळली.

  2. निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी संबंधित पाच कर्मचाऱ्यांना मतमोजणी दिवशीच कारणे दाखवा नोटीस बजावली.

  3. हा प्रकार गंभीर मानून संबंधित कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

Sindhudurg ZP election News : माटणे मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मतांच्या आकडेवारीत तफावत झाल्याचे उघड झाले आहे. नोंद केलेल्या मतांची संख्या व मतदान यंत्रावरील मतदान झालेल्या मतांची संख्या यात तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी संबंधित पाच कर्मचाऱ्यांना मतमोजणी दिवशीच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून आपल्यावर कारवाई का करू नये, याचा खुलासा करण्याचे आदेश कसेकर यांनी दिले आहेत.

त्यांना पाठविलेल्या नोटिशीत कसेकर यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ नमुना व्हीएम-३ (नोंद झालेल्या मतांचा हिशेब) मध्ये अचूक नोंदी घेण्यात आलेल्या नाहीत. या नोटीसद्वारे आपणास कळविण्यात येते की, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ (ता. दोडामार्ग) करिता केंद्र क्र. ५०/१४ माटणे मतदान केंद्रावर आपली नियुक्ती केली होती.

७ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. ९ फेब्रुवारीला मतमोजणीवेळी टेबल क्र. ६ व दुसऱ्या फेरीदरम्यान जेव्हा केंद्र क्र. ५०/१४ माटणेच्या मशीन मतमोजणीकरिता आले तेव्हा नमुना व्हीएम-३ (नोंद झालेल्या मतांचा हिशेब) मधील नोंद केलेल्या मतांची संख्या व मतदान यंत्रावरील मतदान झालेल्या मतांची संख्या यामध्ये तफावत आढळून आली.

Election officials verify voter lists in Pune district after the Election Commission flagged over 67,000 duplicate voters ahead of Zilla Parishad elections.
ZP Election: मकरंदआबांचा गड पोखरत शिंदेंसेनेची कूच: राष्ट्रवादीला नडला ओव्हर कॉन्फिडन्स अन् निष्ठावंतांची जिरवाजिरवी

ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून आपणाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ३४ नुसार कारवाई का करू नये? याबाबतचा लेखी खुलासा नोटीस मिळताक्षणी माझे समक्ष सादर करावा; अन्यथा आपले काहीएक म्हणणे नाही, असे समजून पुढील कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

मतांच्या संख्येतील तफावतीबाबत कसेकर यांनी झोनल अधिकाऱ्यांसह इतरांना नोटीस बजावली आहे. कारवाईबाबत वरिष्ठ निर्णय घेणार निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार असलेल्या त्या पाच कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडले आहे. त्यांचे ते म्हणणे आम्ही जिल्हास्तरावर पाठविले आहे. त्यामुळे पुढील कारवाईचे निर्णय हे वरिष्ठ घेणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा राजमाने यांनी बोलताना सांगितले.

Election officials verify voter lists in Pune district after the Election Commission flagged over 67,000 duplicate voters ahead of Zilla Parishad elections.
ZP Election: मकरंदआबांचा गड पोखरत शिंदेंसेनेची कूच: राष्ट्रवादीला नडला ओव्हर कॉन्फिडन्स अन् निष्ठावंतांची जिरवाजिरवी

FAQs :

1. तफावत नेमकी कशामध्ये आढळली?
नोंदवलेल्या मतांची संख्या आणि मतदान यंत्रावरील मतांची संख्या यामध्ये फरक आढळला.

2. किती कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली?
संबंधित पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

3. ही कारवाई कोणी केली?
निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी ही कारवाई केली.

4. हा प्रकार किती गंभीर मानला जात आहे?
मतमोजणी प्रक्रियेत तफावत आढळणे हा अत्यंत गंभीर प्रकार मानला जात आहे.

5. पुढे काय कारवाई होऊ शकते?
कर्मचाऱ्यांच्या स्पष्टीकरणानुसार शिस्तभंगाची किंवा इतर प्रशासकीय कारवाई होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com