Raj Thackeray MNS Setback : रायगडमध्ये मनसेला धक्का; राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच बड्या नेत्याचा राजीनामा; आता राजीनामा सत्राने संघटनात्मक आव्हान

MNS Setback Raj Thackeray Raigad Tour : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच रायगडमध्ये संघटनात्मक आव्हान निर्माण झाले असून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raigad News : वसंत जाधव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या ९ ऑगस्ट रोजी रायगड दौऱ्यावर आहेत. पण आता त्यांच्या दौऱ्यापूर्वीच दक्षिण रायगड आणि श्रीवर्धन परिसरातील पक्ष संघटनेत अंतर्गत असंतोष उफाळून आल्याचे चित्र आहे. स्थानिक स्तरावर सुरू झालेल्या राजीनामा सत्रामुळे मनसेसमोर संघटनात्मक आव्हान निर्माण झाले असून, आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रीवर्धन तालुक्यात गेली पाच वर्षे मनसे प्रसारमाध्यम प्रमुख म्हणून कार्यरत असलेले सुनील विठोबा रिकामे यांनी नुकताच आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा तालुकाध्यक्ष मृदासभाई काशिनाथ तोंडलेकर यांच्याकडे सुपूर्द केला. वैयक्तिक कामाच्या व्यापामुळे पक्षाच्या कामासाठी अपेक्षित वेळ देता येत नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

राजीनामा देताना रिकामे यांनी पक्ष नेतृत्वाबद्दलची आपली निष्ठा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. "माझी निष्ठा कालही, आजही आणि यापुढेही राज ठाकरेसाहेब तसेच ठाकरे परिवाराप्रती कायम राहील," असे त्यांनी पत्रात नमूद करत राजीनाम्यामागे कोणतेही वैचारिक मतभेद नसल्याचे संकेत दिले आहेत.

Raj Thackeray
Raj Thackeray : नाशिकच्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंचा घणाघात! आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ खास कानमंत्र

दरम्यान, दक्षिण रायगडातील एका वरिष्ठ नेत्याच्या कथित मनमानी कारभारामुळे आणि कार्यकर्त्यांशी होत असलेल्या गैरवर्तनामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आणखी काही महत्त्वाचे पदाधिकारीही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या चर्चेबाबत मनसेच्या अधिकृत स्तरावर कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

याचवेळी, राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याच्या नियोजनासाठी पोलादपूर येथील हॉटेल बालाजीमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या दौऱ्यात माणगाव येथे दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती मनसे कार्यालयाचे उद्घाटन, मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासची पाहणी, तसेच पेण आणि पनवेल येथील पक्ष कार्यालयांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Raj Thackeray
Raj Thackeray : पेरलं तेच उगवलं!" मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कारभारावर राज ठाकरेंची सडकून टीका

राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे रायगडातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच संघटनेतील वाढता असंतोष आणि सुरू झालेल्या राजीनामा सत्रामुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे. दौऱ्यापूर्वी नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश येणार की अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होणार, याकडे रायगडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com