Raj Thackeray : नाशिकच्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंचा घणाघात! आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ खास कानमंत्र

Raj Thackeray on Nashik Potholes: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शहरातील खड्ड्यांच्या समस्येवर भाष्य करत आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचा कानमंत्र दिला.
Raj Thackeray message to party workers
Raj Thackeray message to party workersSarkarnama
Published on
Updated on

MNS Nashik News: मनसे प्रमुख राज ठाकरे आज दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहे. शहरातील खड्डे आणि महापालिकेच्या कारभाराविषयी नागरिकांतील संताप या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे.

राज ठाकरे यांचे आज सकाळी नाशिकला आगमन झाले. यावेळी मुंबई नाका येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या स्वागतानंतर श्री ठाकरे थेट शासकीय विश्रामगृहावर गेले. येथे शहरातील आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. पदाधिकाऱ्यांचा कल समजून घेतला.

Raj Thackeray message to party workers
BJP Politics : भाजपनं तिकीट कापलं, माजी खासदारानं राजकारण सोडतं थेट नोकरीचा मार्ग पकडला

दुपारच्या सत्रात राज ठाकरे यांनी शहर आणि जिल्ह्यातील काही सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. या बैठकीत त्यांनी सद्य राजकीय स्थिती आणि शहराची दुरावस्था हा प्रमुख विषय होता. यासंदर्भात संस्थांनी राज ठाकरे यांच्याकडे महापालिकेच्या कामकाजाविषयी नाराजीची भावना व्यक्त केली.

तत्पूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी शहराच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या समस्यांवर आक्रमक होण्यास सांगितले. महापालिकेत सध्या भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे नगरसेवक तरी त्यांच्या कारभाराबाबत समाधानी आहेत का? असा प्रश्न त्यांनी केला.

प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहर प्रमुख सुदाम कोंबडे, नगरसेविका पवार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शासनाची एसआयआर मोहीम सुरू आहे. यामध्ये भाजप सत्तेच्या माध्यमातून अतिशय प्रयत्नपूर्वक आपल्या समर्थकांची नावे समाविष्ट करीत आहे. विरोधी पक्षांच्या मतदारांची नावे वगळली जात आहे.

Raj Thackeray message to party workers
Healthcare Scams : आयुष्मान भारत योजनेत 15,407 बनावट क्लेम्सचा घोटाळा उघड; डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन

ज्याला ज्याला निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी एसआयआर प्रक्रियेत सहभागी व्हावे. अतिशय जागरूकपणे पाठपुरावा करावा. अन्यथा कितीही परिश्रम आणि सामाजिक कामे केली तरीही आपल्या समर्थक आणि सहानुभूतीदारांची नावे यादीत नसतील तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com