

मुंब्रा येथील कार्यक्रमातील वक्तव्यांवरून नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला
Mumbai News : नुकताच पुण्यातील अखिल भैरवनगर हिंदु संमेलनात भाजप नेते तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर राज्याभर वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणामुळे त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात असतानाच आता ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याच्याविरोधात शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक झाली असून पोलिसांत थेट गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी फिर्याद देण्यात आली आहे.
नितेश राणे सतत हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण करत असून मुस्लिम समुदायाविरोधात बोलत आहे. मुस्लिमांचा उल्लेख ते हिरवे साप असे करतान दिसतात. नुकताच त्यांनी पु्ण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. पण त्यांची ही लढाई इस्लामाच्या विरोधात होती. ती हिंदू विरुद्ध मुस्लिमच होती. पण आपल्यातले काही दीड शहाणे मात्र महाराजांच्या सैनिकांमध्ये मुस्लिम होते असे म्हणत सुटले आहेत. हे त्यांच्या वडीलांनी पाकिस्तानमधून येऊन त्यांना सांगितलंय का? असा सवाल करत जर तसे असेल तर लिखित पुरावे द्या असे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे काही उमेदवारांनी जिंकल्यानंतर हिरवे झेंडे फडकले. हिरवा गुलाल उधळत घोषणाबाजी केली. मात्र आता जनता त्यांनाही संधी पुन्हा देणार नाही. मोदीजींच्या काळात गोष्टी बदलल्या असून पूर्वी सातत्याने खान यांचे चित्रपट यायचे. खान यांच्या शिवाय दुसरे चित्रपटात येत नव्हते.
पण आता छावा, धुरंदर सारखे चित्रपट येत आहेत. रणवीर कपूर देखील रामायण सारखा चित्रपट करत आहे. नाही तर पूर्वी शाहरुख खानचे चित्रपट पाहून लव जिहादच्या केसेस वाढायच्या असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केलं. आता या विधानामुळे वादाला तोंड फुटले असून भाजपकडून यावर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.
तोच मुंब्रा येथील हिंदू संमेलनात मुस्लीम समुदायाबाबत आक्षेपार्ह विधान करण्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणे नितेश राणेंना अंगलट येण्याची शक्यता आहे. नितेश राणेंनी संविधानिक मूल्यांची पायमल्ली करीत राष्ट्रीय सन्मानांचा म्हणजेच संविधानाचा अवमान केल्याची लेखी फिर्याद राष्ट्रवादीने दिली आहे. तसेच नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शनिवारी मुंब्रा येथील हिंदू संमेलनात नितेश राणे यांनी अनेक वादग्रस्त विधाने करत मुस्लीम समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यांनी आपण मंत्री आहोत म्हणून ठिक, नाहीतर जितेंद्र आव्हाड यांना घरी जाऊ दिले नसते असा इशारा दिला होता. आता याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली असून नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली आहे. तसेच नितेश राणे यांच्यावर धार्मिक द्वेष पसरवून दंगलीस प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय सन्मान - अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
याबाबत बोलताना मनोज प्रधान म्हणाले की, मुंब्रा-कौसा भागात अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने रहात आहेत. पण येथे येऊन नितेश राणे दंगल माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. जी अत्यंत धोकादायक बाब आहे. तसेच ते आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देत आहेत. त्यांचे हे कृत्य मंत्रिपदाची शपथेला न पाळणारे आहे. ते विशिष्ट समाजाबाबत आकस ठेवून कृती करत आहेत. हा संविधानिक मूल्यांचा अवमान आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
1. हा वाद कशामुळे निर्माण झाला?
मुंब्रा येथील कार्यक्रमातील वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा वाद निर्माण झाला
2. तक्रार कोणी दाखल केली आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तक्रार दिली
3. कोणत्या कायद्यांतर्गत कारवाईची मागणी आहे?
धार्मिक द्वेष आणि राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईची मागणी
4. प्रकरण कुठे नोंदवले गेले आहे?
ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे
5. पुढे काय होणार?
पोलिसांकडून तक्रारीची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.