ShivsenaUBT News: ठाकरेंनी प्रचंड विश्वास दाखवलेल्या माने अन् डोणगावकरांनी लढण्याआधीच मैदान सोडलं; दोन्ही उमेदवारांना शिवसेनेनं घडवली अद्दल

Chhatrapati Sambhajinagar Shivsena News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी पक्षाला कोकणपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विधानपरिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला.
Uddhav Thackeray- Sanjay Raut
Uddhav Thackeray- Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai\Chhatrapati Sambhajinagar News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी पक्षाला कोकणपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विधानपरिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाळ मानेनंतर आता देवयानी डोणगांवकर यांनीही विधानपरिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यानं मविआ अन् ठाकरेंच्या पक्षांवर लढण्याआधीच जागा गमावण्याची वेळ आली. हा 'माघारी'पॅटर्न जिव्हारी लागलेल्या उद्धव ठाकरेंनी दोन्ही उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे.ज्या महायुतीच्या सुहास शिरसाठ यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगांवकर लढत देणार होत्या. आता त्यांनीच ऐनवेळी माघार घेतल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी देवयानी डोणगावकर यांनी आपले पती गंगापूर साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासोबत जाऊन अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेतल्यानंतर काही वेळात उद्धव ठाकरेंच्या आदेशानं डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.

देवयानी डोणगांवकर यांची माघार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी पक्षासाठी हा मोठा धक्का होता. पण डोणगांवकर यांच्या माघारी मागे एक मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या कृष्णा पाटील डोणगांवकर यांना 1 जून 2026 रोजी सहकार विभागाकडून संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणुकीतून माघारीसाठी सत्ताधाऱ्यांकडून सहकार विभागाला हाताशी धरून दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा यानंतर सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Shivsena Crime News : उद्धव ठाकरेंच्या नेत्यावर पोलीस स्टेशन परिसरातच महिलांकडून हल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांनी स्वतः अशा प्रकारची नोटीस सहकार विभागाकडून आपल्याला प्राप्त झाल्याची कबुली दिली होती. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेल्या दिलीप बनकर यांच्या 8 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच एक वर्षापुर्वी दिलेल्या तक्रारीची दखल घेत सहकार निबंधक प्रादेशिक सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून चेअरमन कृष्णा पाटील डोणगावंकर यांना शेतकरी, सभासद यांच्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई का करण्यात येऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली आहे.

देवयानी डोणगावकर यांच्या विधान परिषदेतील निवडणुकीतून माघार घेण्यामागे सहकार विभागाने पाठवलेली ही नोटीसच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. पंधरा दिवसात या नोटिशीबाबत खुलासा करण्यास गंगापूर साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांना सांगण्यात आले आहे. देवयानी डोणगावकर यांच्या विधान परिषदेतील निवडणुकीतून माघार घेण्यामागे सहकार विभागाने पाठवलेली ही नोटीसच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Mahayuti MLC Election : विधानपरिषद निवडणुतीत 4 बंडखोरांनी महायुतीला फेस आणला... शेवटपर्यंत मनधरणीनंतरही 4 मतदारसंघातील अर्ज कायम

देवयानी डोणगावकर यांच्या माघारीआधी कोकण विधान परिषदेतही मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना व महायुतीचे कोकण विधानपरिषद निवडणुकीचे अधिकृत उमेदवार बाळ मानेंवर यांच्यावरही हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. ठाकरेंनी विश्वास दाखवून या एकनिष्ठ शिवसैनिकाला उमेदवारी जाहीर केली होती. पण मंत्री व भाजप नेते नितेश राणेंनी मानेंना फोडत ठाकरेंना धक्का दिला होता. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com