Crime News : दोन अल्पवयीन बहिणींना राजकीय नेत्यांनीच वेश्याव्यवसायात ढकलले? शिंदेंचा विद्यमान अन् भाजपच्या माजी नगरसेवकासह चार जण जेरबंद

Minor Girl Prostitution Case : नवी मुंबईत अल्पवयीन बहिणींना देहव्यापाराच्या दलदलीत राजकीय नेत्यांनीच ढकलल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली असून या प्रकरणात आजी-माजी नगरसेवकासह चार जण जेरबंद करण्यात आले आहेत.
Navi Mumbai ulwe minor sisters Prostitution Case
Navi Mumbai ulwe minor sisters Prostitution CaseSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai News : नवी मुंबईतील उलवे परिसरात एका लॉजवर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाई आजी-माजी नगरसेवकाचे घृणास्पद कृत्य उघड झाले असून यामुळे मानवी तस्करीचे धागे दोरे उघड झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश झाला असून दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचे प्रकरण उघड झाले आहे. याप्रकरणात एक महिला दलाल, एक व्यावसायिक आणि एका कंत्राटदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत उलवे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजिंक्य सुभाष गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी सायंकाळी उलवे सेक्टर-१९ येथील 'ला रेसिडेन्सी लॉज'मध्ये ही कारवाई करण्यात आली. यावेळी तेथे दोन अल्पवयीन मुली अल्पवयीन आढळून आल्या. तर या दोन्ही अल्पवयीन मुलींना ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणल्याचे तपासात उघड झाले.

तर याच तपासात भाजपचा माजी नगरसेवक कुणाल नाईक याने या अल्पवयीन मुलींशी वेश्यागमनासाठी दलाल महिलेशी संपर्क साधले होते. तर लॉज'मध्ये या मुलींवर कुणाल नाईक याच्यासह शिंदेंच्या शिवसेनेचा स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलाडकर, प्रमोद पाटील आणि अच्युत पाटील यांनी अत्याचार केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

Navi Mumbai ulwe minor sisters Prostitution Case
Crime News : राज ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट; मनसे कार्यकर्ते आक्रमक, आरोपी ताब्यात!

दरम्यान या प्रकरणात चारही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून या अटकेनंतर आता नवी मुंबईत राजकीय खळबळ उडाली आहे. तर यातील एका पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबात तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्याचा आरोप केला आहे.

Navi Mumbai ulwe minor sisters Prostitution Case
Crime News: 'फॉर्च्युनर'च्या मागे-पुढे ट्रक लावून रस्त्यात गाठलं,पेट्रोल टाकून गाडी पेटवली; भाजपच्या बड्या नेत्यासह तीन जणांना निर्घृणपणे संपवलं

ही कारवाई पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा पाटील करीत असून, न्यायालयाने आरोपींना २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com