KDMC News : दारूच्या नशेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी माणसांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भूमीत गडा या व्यक्तीला मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल करत चौकशी सुरू केली आहे. मात्र संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि मराठी अस्मितेविरोधात कोणीही वाकडे बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सरळ करण्याची ताकद मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे, असा इशारा मनसेच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी दिला. मुंबईत सुरू असलेल्या एका प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून भूमीत गडा या व्यक्तीने समाजमाध्यमांवर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मराठी माणसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करत शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
ही बाब कल्याण लोकसभा सचिव राहुल कामत, विधानसभा सचिव अरुण जांभळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे, उपशहराध्यक्ष दीपक शिंदे, विभागाध्यक्ष कदम भोईर, चेतन म्हात्रे, रितेश म्हात्रे, रतीकेश गवळी, उपविभाग अध्यक्ष समीर भोर, शाखाध्यक्ष विनायक मुंडे आदी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. सुरुवातीला संबंधित व्यक्तीला समाजमाध्यमांतूनच पोस्ट हटविण्याचे आणि आक्षेपार्ह भाषा वापरणे थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र तो त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत मनसेने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.