JNPA Drug Seizure : मक्याच्या गोणीत लपवले 55 किलो ड्रग्ज; 300 कोटींच्या साठ्याने खळबळ, थेट पाकिस्तानाची संबंध?

JNPA port 55 kg drugs seized : जेएनपीए परिसरातील कंटेनर फ्रेट स्टेशनवर डीआरआयची कारवाई; दोघे ताब्यात, आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कच्या शक्यतेचा तपास सुरू.
55 kg drugs worth 300 crore seized
JNPA maize sacks drug seizureSarkarnama
Published on
Updated on

JNPA drug seizure Pakistan connection: जेएनपीए बंदर परिसरातील एका कंटेनर फ्रेट स्टेशनवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत मक्याच्या गोणीत लपवून ठेवलेले तब्बल 55 किलो मेथाम्फेटामाइन जप्त केले आहे.

या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, तस्करीच्या संभाव्य आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा तपास सुरू आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना (Officers) मिळालेल्या गुप्त माहितीनंतर जेएनपीए परिसरातील एका संशयित कंटेनरची तपासणी करण्यात आली. कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात मका भरलेल्या गोण्या होत्या. मात्र, बारकाईने तपासणी केल्यानंतर एका गोणीत संशयास्पद पदार्थ लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.

यानंतर मोबाईल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. प्राथमिक चाचणीत जप्त केलेला पदार्थ मेथाम्फेटामाइन (Drugs Case) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डीआरआयने 55 किलो अमली पदार्थ जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.

55 kg drugs worth 300 crore seized
Jaish-e-Mohammed Suspect : जैश संशयित हमीम मंडल प्रकरणात मोठी कारवाई; 'हनी-ट्रॅप नेटवर्क'च्या संशयावरून महिला साथीदार अटक

प्राथमिक तपासात या तस्करीचा संबंध पाकिस्तानस्थित अमली पदार्थ तस्कर महंमद हुसेन दाद याच्या कथित सिंडिकेटशी असण्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. हे नेटवर्क मालवाहू कंटेनरच्या माध्यमातून विविध देशांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची शक्यता तपासली जात आहे. तथापि, या कथित आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत तपास सुरू असून, तपास यंत्रणांकडून अधिकृत निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

55 kg drugs worth 300 crore seized
Balasaheb Nahata Arrest : श्रीगोंद्याचे बाळासाहेब नाहाटांना अटक; बिगरजामीनपात्र वॉरंटनंतर कारवाई, 11 जणांची 9.49 कोटींची कथित फसवणूक प्रकरण

22 टन मक्याच्या खेपेतून तस्करीचा डाव?

तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या सिंडिकेटशी संबंधित हँडलर्सनी मुंबईतील काही आयात-निर्यातदार कंपन्यांशी संपर्क साधला होता. उत्तर प्रदेशातील एका व्यापारी संस्थेच्या माध्यमातून सुमारे 22 टन मका परदेशात पाठविण्याचे नियोजन करण्यात आल्याचा संशय आहे.

या खेपेपैकी सुमारे 17.5 टन मका पॅक करून जेएनपीए परिसरातील कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये आणण्यात आला होता. याच मालाच्या आड अमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न झाल्याचा तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे.

आता तपासाचा रोख कुणाकडे?

या प्रकरणात तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण, अमली पदार्थांचा मूळ स्रोत कोणता, भारतातील नेटवर्कमध्ये कोणकोण सहभागी आहे आणि हा साठा नेमका कुठे पोहोचविण्यात येणार होता, याचा डीआरआयकडून तपास सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची चौकशी सुरू असून, या कारवाईतून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com