Raigad Politics : अनिकेत तटकरे-गोगावले भेटीनंतर रायगडचे राजकारण तापले: महेंद्र दळवींचा स्फोटक इशारा; 'तटकरेंवर विश्वास नाही, दगाफटका...'

Mahendra Dalvi Criticizes Sunil Tatkare After Aniket Tatkare Meets Bharat Gogawale in Mumbai : कोकण विधान परिषदेचे बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यावर अनिकेत रटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे.
Aniket Tatkare Meets Bharat Gogawale; Mahendra Dalvi
Aniket Tatkare Meets Bharat Gogawale; Mahendra Dalvisarkarnama
Published on
Updated on

Raigad News : कोकणाच्या राजकारणात पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाच्या वादाने डोकं वर काढलं असून दररोज या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात खटके उडताना दिसत आहे. एकीकडे नेते पालकमंत्रिपदावरून वाद घालत असतानाच नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी मुंबईत थेट शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली. कोकण विधानपरिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्यानंतर तटकरे यांनी पहिल्यांदाच गोगावले यांची भेट घेतली.

या भेटीनंतर आता रायगडच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे. तर या भेटीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तटकरे यांच्या राजकीय प्रवासातील उलटफेर आणि त्यांच्या राजकीय धोरणांना माझा आज, उद्या आणि भविष्यातही कायम तीव्र विरोध राहील, असे म्हटलं आहे.

एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर गोगावले आणि तटकरेंमधील वाद काही कमी झाल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र पालकमंत्रिपदाचा तिढा काही केल्या अद्याप सुटलेला नाही. यामुळे अजुनही या मुद्द्यावरून दोन्ही पक्षातील नेत्यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहे. अशातच अनिकेत तटकरे यांनी गोगावलेंची भेट घेत त्यांचा सत्कार केला. तसेच गोगावलेंचे आशीर्वाद घेत त्यांना पेढाही भरवला.

Aniket Tatkare Meets Bharat Gogawale; Mahendra Dalvi
Raigad Politics : विधानपरिषद निवडणुकीत सुनील तटकरेंकडून निकटवर्तीयाचा राजकीय घात? सुधारक घारे वेगळा निर्णय घेणार?

या भेटीनंतर लवकरच गोगावले पालकमंत्री होतील अशी कुजबूज होताना दिसत असतानाच आमदार महेंद्र दळवी यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय प्रवासातील उलटफेर आणि त्यांच्या राजकीय धोरणांना आज, उद्या आणि भविष्यातही कायम तीव्र विरोध राहील, असा इशारा दिला आहे.

तसेच अनिकेत तटकरे हे आता विधानपरिषदेवर निवडून गेले असून ते आपल्या वरिष्ठांना आणि मंत्र्यांना भेटत आहेत, हे त्यांचे काम आहे. मी देखील अनिकेत तटकरे यांचं स्वागत करेन. माझा तटकरे कुटुंबाशी कोणताही वैयक्तिक किंवा कौटुंबिक वाद नाही. मात्र, तटकरे हे पालकमंत्रिपदाच्या विषयावर घुमजाव करत आहेत. पालकमंत्रिपद आणि विधानपरिषद जागा हा बार्गेनिंग विषय नाही. पण तो तटकरेंनी एकत्र करत केला असा आरोप दळवी यांनी केला आहे. तर पालकमंत्रिपद गोगावलेंनाच मिळणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

Aniket Tatkare Meets Bharat Gogawale; Mahendra Dalvi
Raigad Politics : शिवसेना-राष्ट्रवादी वाद मिटला? शिंदेंच्या आमदाराकडून तटकरेंचा उल्लेख 'साहेब'; पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार?

तसेच यावेळी दळवी यांनी स्वपक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दलची नाराजी आणि खंत व्यक्त करत महायुतीमध्ये जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याच्या आरोप देखील केला आहे. दरम्यान आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंसह आपल्याच पक्षातील नेत्यांवर केलेल्या प्रहारानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद अधिक उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com