Modi Express Vs Shivsena Express : राणेंच्या मोदी एक्सप्रेसला सामंतांचं शिवसेना एक्सप्रेसने प्रत्युत्तर

Kokan Politics : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या पाहता कोकणवासियांसाठी कोकण रेल्वेने रोरो सवेवा सुरू केली आहे. समुद्र मार्गेही रो रो सेवा सुरू आहे. वंदे भारतमध्ये डब्बे वाढण्यात आले असताच विशेष एक्सप्रेसमध्ये देखील वाढ करण्यात आली आली.
Kokan Politics Modi Express Vs Shivsena Express Nitesh Rane And Uday Samant
Kokan Politics Modi Express Vs Shivsena Express Nitesh Rane And Uday Samantsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. भाजपने गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस सुरू केली.

  2. शिंदे गटाच्या शिवसेनेनं प्रत्युत्तरादाखल शिवसेना एक्सप्रेस सुरू केली.

  3. कोकण प्रवास सुलभ करण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेत राजकीय टक्कर.

Kokan Politics : तळ कोकणात सध्या महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय द्वंद पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरीचे पालकमंत्री नितेश राणे सतत आमने-सामने येताना दिसत आहे. नुकताच त्यांच्यात चिपळूणमधील एका नेत्याच्या प्रवेशावरून वाद झाला होता. जो भगव्या शालीपर्यंत पोहचला. तर आता त्यांच्यातील वादाची धार गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई- कोकण प्रवासात देखील दिसून येत आहे. भाजपने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही दोन विशेष रेल्वे कोकणात सोडल्या. त्यावर कुरघोडी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील विशेष रेल्वे सोडली. भाजपचे नेते मंत्री नितेश राणे यांनी मोदी एक्सप्रेस सोडली. तर उदय सामंत आणि निलेश राणे यांनी शिवसेना एक्सप्रेसचे नियोजन केले. यामुळे येथे राणेंच्या मोदी एक्सप्रेसला सामंतांच्या शिवसेना एक्सप्रेसनं प्रत्युत्तर अशी चर्चा सुरू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन गणेशोत्सवाच्या तोंडावर भाजपकडून जोरदार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष रेल्वे सेवेसह मुंबईतून कोकणात जाणासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी दोन मोदी एक्सप्रेस सोडल्या होत्या. ज्यामुळे मुंबईतून कोकणवासियांना कोकणात जाण्याचा मार्ग सुलभ केला आहे.

Kokan Politics Modi Express Vs Shivsena Express Nitesh Rane And Uday Samant
Kokan Politics : 'हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी' : आरोपांनी घेरलेल्या योगेश कदमांच्या डोक्यावर 'गॉडफादरचा' हात

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी नितेश राणे यांच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षापासून विशेष ट्रेनची व्यवस्था केली जाते. यंदाही मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात आली. महत्वाचे म्हणजे यंदा दोन विशेष ट्रेन कोकणवासीयांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यापाठापाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपला शह देण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली.

गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी वर्तकनगर, चरई, खोपट, लोकमान्य नगर, बाळकूम, डोंबिवली, कल्याण अशा विविध भागातून मोठ्या प्रमाणात मोफत बससेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. आताही तशीच मागणी केली जात असून शिंदे यांच्या समर्थकांनी 2 हजारहून अधिक एसटी गाड्यांची नोंदणी केली आहे. तर या बसेस आज (सोमवार) पासून कोकणवासियांना मोफत प्रवास देत आहेत. दरम्यान कोकणात गणपतीला गावी जाण्यासाठी “शिवसेना एक्स्प्रेस”ची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून दादर ते कुडाळ दरम्यान ही विशेष ट्रेन धावणार आहे. मुंबईतील कोकणवासियांसाठी ही गणपती विशेष ट्रेन असून ती मोफत असेल. तर या रेल्वेच्या विनामूल्य तिकीट बुकिंगसाठी 8652489964, 8652272031 या नंबरवर संपर्क साधा असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.

मुंबई व उपनगरांत नोकरीस असणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात परतण्यासाठी मंत्री नीतेश राणे यांनी मोदी एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. दिनांक 23 व 24 ऑगस्ट 2025 अशा दोन दिवशी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या रेल्वे सोडण्यात आल्या होत्या.

Kokan Politics Modi Express Vs Shivsena Express Nitesh Rane And Uday Samant
Kokan Politics : राज-उद्धव ठाकरेंचे युतीचे संकेत; कोकणात सर्वात जास्त फटका शिंदेंनाच बसणार!

FAQs :

प्रश्न 1: मोदी एक्सप्रेस कोणाच्या वतीने सुरू करण्यात आली?
उत्तर: भाजप व नितेश राणे यांच्या वतीने.

प्रश्न 2: शिवसेना एक्सप्रेस का सुरू करण्यात आली?
उत्तर: भाजपच्या मोदी एक्सप्रेसला राजकीय प्रत्युत्तर देण्यासाठी.

प्रश्न 3: या रेल्वे सेवा कोणासाठी आहेत?
उत्तर: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी.

प्रश्न 4: या ट्रेनला राजकीय महत्त्व का दिलं जातंय?
उत्तर: स्थानिक स्वराज्य निवडणुका व गणेशोत्सव पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत स्पर्धा वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com