Crime News : विरार हादरलं! भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या; मंडळ अधिकाऱ्यावरही प्राणघातक हल्ला

Virar Crime News : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये धक्कादायक घटना घडली असून येथील एका खदानीत RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तसेच मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासह एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
Virar Crime News; RTI Activist Murder
Virar Crime News; RTI Activist Murdersarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पालघर जिल्ह्यातील विरारच्या शिरगाव परिसरात आरटीआय कार्यकर्ता आणि मंडळ अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

  2. हल्लेखोरांनी गाडीची तोडफोड करत लाकडी दांड्याने मारहाण केली, ज्यात आत्माराम पाटील यांचा मृत्यू झाला.

  3. मंडळ अधिकारी आणि त्यांचा सहकारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Palghar Crime News : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली असून आरटीआय कार्यकर्त्यासह विरारच्या मंडळ अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात मंडळ अधिकाऱ्यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तर आरटीआय कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. आत्माराम पाटील असे मृत आरटीआय कार्यकर्त्याचे नाव असून प्रभाकर पाटील असे मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यात आणखी एक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणात खदान मालकाचे नाव समोर आले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील माहितीच्या अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणांमध्ये पाठपुरावा करत होते. तर त्यांनी खदानीशी संबंधित काही माहिती घेतल्याचेही चर्चा असून मंगळवारी (ता.12) भरदिवसा दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

विरार पूर्वेत असणाऱ्या शिरगाव येथील खदानी परिसरात आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्या वादातून त्यांची दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याची चर्चा येथे सुरू झाली आहे.

Virar Crime News; RTI Activist Murder
Crime News : Instagram वर जडलेल्या प्रेमासाठी तरुणीने ओलांडली सीमा, विनापासपोर्ट भारतात प्रवेश केला अन् कुणकुण लागताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

यावेळी मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासह एका सहकाऱ्याला लाकडी दांड्याने जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेची माहिती मिळताच विरार पोलिस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

अद्याप या हल्ल्याच्या हत्तेमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. तसेच ही हत्या खदानीशी संबंधित वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबतचाही तपास केला जातोय.

Virar Crime News; RTI Activist Murder
Crime News : संतापजनक घटना : पन्नास वर्षीय नराधमाचा १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता चार महिन्यांची गर्भवती

FAQs :

1. ही घटना कुठे घडली?

पालघर जिल्ह्यातील विरारच्या शिरगाव गावाजवळील खदानी परिसरात ही घटना घडली.

2. हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला?

आत्माराम पाटील यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

3. हल्ल्यात आणखी कोण जखमी झाले?

मंडळ अधिकारी आणि त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.

4. हल्लेखोरांनी काय नुकसान केले?

हल्लेखोरांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.

5. पोलिसांकडून काय कारवाई सुरू आहे?

पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com