

MNS Mahad City President Pankaj Umasare Resignation News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाड शहराध्यक्ष पंकज प्रमोद उमासरे यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यानंतर महाडसह रायगडच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे. गेल्या चार वर्षांपासून शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राजकीय टीका केली होती. या टीकेला पंकज उमासरे यांनी सोशल मीडियावर प्रत्युत्तर देत गोगावले यांच्यावर देखील वैयक्तिक टीका टिपणी केली होती.
ज्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांनी पंकज उमासरे यांच्यावर हल्ला केला होता. चवदार तळे येथील पंकज प्रेम मास्टर व फोटो स्टुडिओ दुकानात घुसून लाथा बुक्क्यांनी व ठोशाने मारहाण केली होती. ज्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जखमी उमासरे यांना प्राथमिक उपचारासाठी महाग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर माणगाव रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी रुग्णालयात उमासरे यांची भेट घेतली होती.
गेल्या चार वर्षांपासून शहराध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या उमासरे यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना आपला पत्र पाठवत राजीनामा दिला आहे. त्यांनी या पत्रात आपण वैयक्तिक कारणांसह कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे पद सोडत असल्याचे म्हटले आहे. उमासरे यांनी शहराध्यक्षपदाच्या कार्यकाळात महाड शहरातील विविध राजकीय प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली होती.
आंदोलनांच्या माध्यमातून कथित गैरप्रकारावर आवाज उठवला होता. यामुळे मनसेच्या आक्रमक भूमिकेचा शहरातील प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. दरम्यान आता मनसेच्या आक्रमक प्रमुख चेहरा असणाऱ्या उमासरे यांनी अचानक राजीनामा दिल्याने शहर प्रमुख नवा चेहरा कोण असेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.