Konkan Politics : कोकणात राजकीय भूकंप! भाजपचा दोन्ही शिवसेनांना जबरदस्त धक्का, सरपंच आणि पंचायत समिती सदस्यांच्या हाती कमळ

Both Shivsena Party workers joined BJP : कोकणात भाजपने मित्र पक्ष शिवसेनेसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. येथे तीन बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी कमळ हाती घेतलं आहे.
Both Shivsena Party workers joined BJP; Nitesh Rane, Uddhav Thackeray  and Eknath Shinde
Both Shivsena Party workers joined BJP; Nitesh Rane, Uddhav Thackeray and Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Devgad News : सध्या कोकणात रायगड-रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या जागेवरून जोरदार रस्सी खेच पाहायला मिळत आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जागेवरून संघर्ष पाहायला मिळत आहे. एक एक मतदारासाठी दोन्ही पक्ष तयारी लागले असून कोणाच्या वाट्याला ही जागा जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच ही जागा महाविकास आघाडीने ठाकरेंच्या शिवसेनेला सोडली असून माजी आमदार बाळा माने यांना उमेदवारी घोषित केली आहे. यामुळे महायुतीच्या समोर मविआचे तगडे आव्हान असेल अशी चर्चा आहे.

पण याच चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह शिंदेंच्या शिवसेनेला कोकणात भाजपने जोरदार धक्का दिला आहे. देवगडमध्ये दोन्ही शिवसेनेला हा धक्का बसला असून पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे कोकणात भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला आहे. यामुळे आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

रायगड-रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कोकणात मोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत आहे. अशातच देवगड-विजयदुर्गमधील ठाकरेंच्या तीन ३ प्रमुख शिलेदारांना शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील पंचायत समितीचे एकमेव सदस्य असणारे विष्णू घाडी यांचा समावेश आहे.

Both Shivsena Party workers joined BJP; Nitesh Rane, Uddhav Thackeray  and Eknath Shinde
konkan politics : भास्कर जाधवांना धक्का, शेखर निकमांनी केली शिवसेना-भाजपशी युती; राष्ट्रवादीचा अडीच वर्षांचा फॉर्मुला अन् मोठी मागणी

विष्णू घाडी यांनी शिवसेनेची साथ सोडत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. याचवेळी देवगड तालुका प्रमुख जयेश नर, विभाग प्रमुख संदीप डोलकर यांनी देखील कमळ हाती घेतलं आहे. यामुळे ठाकरेंना कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात जबर धक्का बसल्याची चर्चा आहे.

तसेच येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील धक्का बसला असून मनचे गावचे सरपंच दिपक तोरसकर यांनी देखील भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. तोरस्कर यांच्या प्रवेशावेळी गिर्ये ग्रामपंचायत सदस्य विनोद गावकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतल्याने कोकणात भाजपची ताकद वाढली आहे.

Both Shivsena Party workers joined BJP; Nitesh Rane, Uddhav Thackeray  and Eknath Shinde
konkan Politics : भाजपने फिनिक्स भरारी घेत उलथवली काँग्रेसची 20 वर्षांची सत्ता; ZP च्या राजकारणातून पहिल्यांदाच बाहेर

यावेळी प्रवेशानंतर नितेश राणे यांनी, 'गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप हाच एकमेव पर्याय असून हाच विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. यामुळेच मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश सुरू असून आताही विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास ही भाजपची सर्वात मोठी ताकद असून प्रवेश करणाऱ्यांच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी भाजप घेईल अशी ग्वाही नितेश राणे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com