Raigad Politics : अजितदादांच्या शिलेदाराचा रायगडच्या राजकारणात भूकंप! शिंदेंना कोकणात धक्का देत घडवून आणला 'गेमचेंजर' पक्षप्रवेश

Raigad Politics Shivsena Vs NCP : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या राजकारणात भूकंप होताना दिसत आहेत.
Raigad Politics NCP MP Sunil Tatkare And DCM Eknath Shinde
Raigad Politics NCP MP Sunil Tatkare And DCM Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र सुरू आहे.

  2. सुनील तटकरे यांनी मुरूडमधील शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.

  3. येथे झालेल्या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे तटकरेंचे राजकीय वजन वाढले असून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Raigad News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. येथे महायुती होणार नाही असे स्पष्ट संकेत मिळत असल्यानेच पक्ष फोडाफोडीचे महाभारत सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचा नेता फोडत अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला. तर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी देखील महत्वाचा नेता फोडत गोगावलेंना धक्का दिला. आता आणखी एक मोठा धक्का तटकरे यांनी दिला असून दुसरा देखील देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे येथे पक्ष फोडाफोडीला पेव फुटल्याचे बोलले जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवताना दिसत आहे. राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा सामना येथे स्थानिकच्या आधीच रंगला आहे. तटकरे यांनी मुरुडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. तर आता आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदार संघात एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत असून मोठा मासा गळाला लावला आहे. या घडामोडींमुळे रायगडच्या राजकारणात राजकीय समिकरणं बदणार आहेत.

मुरुड तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी घटना घडली असून शिवसेनेचे प्रमुख नेते भाई सुर्वे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे मुरुडच्या राजकारणात भूकंप आला आहे. तर आगामी निवडणुकांपूर्वी तटकरेंसाठी “गेमचेंजर” ठरणार आहे.

Raigad Politics NCP MP Sunil Tatkare And DCM Eknath Shinde
Raigad politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर तटकरेंची खेळी, गोगावलेंचा विश्वासूच पळवला, शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

याच पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात तटकरे यांनी पुन्हा एकदा मंत्री भरत गोगावलेंसह शिवसेनेच्या आमदारांना डिवचले. त्यांनी, “प्रत्येकाच्या दिव्याखाली अंधार असतो. म्हणून आरोप करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे. काही जण स्वतःची तत्त्वे दुसऱ्यांवर लादतात, पण कार्यकर्ताच पक्षाचा खरा आत्मा असतो. भाई सुर्वे यांचा पक्षप्रवेश हा केवळ राजकीय घटना नसून हा सुसंस्कृत विचारांचा विजय आहे. भाई सुर्वे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हा सन्मान आणि सुसंवादाचे प्रतीक असल्याचेही तटकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच सुर्वे यांना पक्षात मानाचे स्थान दिले जाईल, त्यांच्या ताकदीचा उपयोग मुरुड तालुक्याच्या विकासासाठी केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. तसेच तटकरे यांनी “संयम आणि सबुरी” याचे महत्व सांगताना राजकारणात वेळ बदलत असते, पण सुसंस्कृत विचार टिकून राहतात. आम्ही जनतेच्या मनात घर केलं आहे, आणि हेच आमचं खऱ्या अर्थाने यश असल्याचेही म्हटलं आहे.

यावेळी सुर्वे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना, आपण सात वर्ष आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत होतो. जेव्हा पक्षात कोणी नव्हते, तेव्हा आमची किंमत होती. पण आता आम्हाला दुर्लक्षित केले गेलं. यामुळेच आम्ही आता ठरवलं असून जिथं विचारधारेचा सन्मान तोच आमचा पक्ष. यामुळे आम्ही राष्ट्रवादीची वाट धरल्याचेही ते म्हणाले.

आता भाई सुर्वे यांच्यासोबत माजी सभापती अभिषेक काते यांच्यासह शिवसेनेतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर मुरुड तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. तर आता भाई सुर्वे यांच्या प्रवेशानंतर मुरूडमधील राजकीय स्पर्धेला नवे वळण आले असून तटकरेंचे वजन वाढले आहे.

दरम्यान आमदार दळवी यांच्या राजकारणाचा शिंदेच्या शिवसेनेता फटका बसताना दिसत आहे. दळवी यांनी दिलीप भोईर यांना जवळ केल्याने राजा केणी राष्ट्रवादीशी घरोबा करताना दिसत आहेत. राजा केणी यांना शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी मिळणार की नाही, अशी चर्चा सध्या येथे जनमानसातून उमटत आहे. तसेच केणी यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्याची चर्चा आहे. त्यातच ते आदिती तटकरेंच्या राष्ट्रवादीत जातील, अशीही चर्चा आहे. यामुळे आमदार दळवी यांचे अगदी जवळचे असणारे राजा केणी आमदारांपासून दूरावले असून ते लवकरच राष्ट्रवादीत जातील असे बोलले जात आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह हळूहळू उघड होतानाही दिसत आहे.

Raigad Politics NCP MP Sunil Tatkare And DCM Eknath Shinde
Raigad Politics : राष्ट्रवादी-शिवसेनेचा संघर्ष शिगेला? एकमेकांचे उट्टे काढणारे तटकरे-गोगावले येणार पहिल्यांदाच एकत्र, भाजप नेताही असणार मंचावर

FAQs :

1. रायगडमध्ये काय घडले?
मुरूडमधील शिवसेनेचे नेते भाई सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

2. भाई सुर्वे कोण आहेत?
ते आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख नेते असून स्थानिक राजकारणात प्रभावी व्यक्तिमत्व आहेत.

3. सुनील तटकरे यांची भूमिका काय आहे?
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी हा प्रवेश सोहळा घडवून आणत आपला पक्ष विस्तारला आहे.

4. भरत गोगावले यांचा यात संबंध काय?
भरत गोगावले यांनी याआधी तटकरेंच्या विश्वासू नेत्याला शिवसेनेत आणले होते, त्यामुळे दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे.

5. या घडामोडींचा स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
या वादामुळे मुरूड आणि रायगड जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com