Shivsena : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची दहशत? शेकाप कार्यकर्त्याला मारहाण, माफीही मागायला लावली; व्हिडिओ व्हायरल

Shivsena Vs Shetkari Kamgar Paksha : रायगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वैमनस्यातून हाणामारीचे प्रकार घडत असून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच आता शेकापच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे.
Raigad Crime
Raigad Crime sarkarnama
Published on
Updated on
Summary
  • रायगड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात सतत मारहाणीचे प्रकार घडत असून वातावरण चांगलेच तापले आहे.

  • शिवसेना कार्यकर्त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्याला पोलिस ठाण्याच्या आवारातून उचलून नेत मारहाण केल्याचा आरोप आहे.

  • जबरदस्ती माफी मागायला लावून व्हिडिओ व्हायरल केल्याने शिंदेंच्या शिवसेनेवर गुंडगिरीचे आरोप होत आहेत.

Raigad News : रायगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मारहाणीचे प्रकार घडत असून यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही महिन्यांपुर्वी प्रचाराच्या आधी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे शहरप्रमुख पंकज उमासरे यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत राडा झाला होता. या प्रकरणानंतर आता शिवसेना कार्यकर्त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्याला पोलीस ठाण्याच्या आवारातून उचलून नेत जबर मारहाण केली आहे. तसेच त्यांना जबरदस्तीने माफी मागण्यास भाग पाडून त्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. ज्यामुळे आता येथे भाजने जे केलं तोच कित्ता शिंदेंच्या शिवसेनं गिरवल्यासह कार्यकर्त्यांची गुंडगिरी वाढल्याचे बोलले जात आहे.

रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार तणाव निर्माण झाला असून अनेकदा वाद हाणामारी पर्यंत गेला आहे. अशातच येथे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करत दहशत निर्माण केली होती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकारी सतीश पाटील यांना त्यांच्या आईसमोरच मारहाण करत त्यांच्या आईला देखील धक्काबुक्की करत अश्लील शिवी गाळी केल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यानंतर येथे खळबळ उडाली होती.

या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा येथे राजकीय हाणामारी झाल्याचे समोर आले असून मुरूड तालुक्यामध्ये शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी शेकाप कार्यकर्ते नरेश दिवेकर यांना मारहाण केलीय. धक्कादायक म्हणजे दिवेकर यांना पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण झाल्याने शिंदेंचे पदाधिकारी आता गुंडगिरी करत असल्याची येथे चर्चा सुरू झाली असून संताप व्यक्त केला जातोय. तसेच या प्रकरणात कठोर कारवाई न करता, अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना सोडून देण्यात आल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.

Raigad Crime
Shivsena News : शिवसेनेच्या तंबूत भाजप अन् मनसे इच्छुकांची घुसखोरी,अर्जही घेतले! चार तासांत पाचशे फाॅर्म संपले

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दळवी यांचा एक आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल सध्या मिडीयावर व्हायरल झाला आहे. तो व्हीडीओ दिवेकर यांनी मुरूड जंजिरा सिटीझन फोरम या सोशल मिडीयाच्या ग्रुपवर बुधवारी सायंकाळी पाठवविला. याच ग्रुपवर मुरूडमधील शिवसेनेचे काही कार्यकर्ते असून त्यांनी याच प्रकारावरून दिवेकर यांना टार्गेट करत त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद थांबवला. मात्र शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या समोरच दिवेकर यांच्यावर आरेरावी करत धमक्या दिल्या. तसेच मुरूड नगरपरिषदेच्या एका कंटेनर खोलीमध्ये दिवेकर यांना नेत मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना जबरदस्तीने माफी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हीडीओ काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला.

दिवेकर यांना हाताबुक्क्याने मारहाण करण्यात आली असून हा प्रकार मुरूड पोलिसांसमोर घडल्यानंतरही कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून शेकापकडून संताप व्यक्त करण्यात येत असून पोलिसांवर आरोप केला जात आहे. तर दिवेकर यांना मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या यशवंत पाटील व अविनाश शिंदे यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची कारवाई देखील करण्यात यावी, अशी मागणी शेकापने मुरुड पोलीस व जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे केली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून आता पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Raigad Crime
Shivsena News : एकनाथ शिंदेंनी नागपुरात बसून हलविली बालेकिल्ल्यातील सुत्रं; महापालिका निवडणुकीसाठी ठरली रणनीती...

FAQs :

1. रायगडमध्ये नेमका काय प्रकार घडला?
शिवसेना कार्यकर्त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्याला उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप आहे.

2. ही घटना कुठे घडली?
पोलिस ठाण्याच्या आवारातून कार्यकर्त्याला नेल्याचा दावा केला जात आहे.

3. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे का?
होय, जबरदस्ती माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

4. याआधीही रायगडमध्ये असे प्रकार झाले आहेत का?
होय, काही महिन्यांपूर्वी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीचे प्रकार घडले होते.

5. या घटनेमुळे काय प्रश्न उपस्थित झाले आहेत?
रायगडमधील कायदा सुव्यवस्था आणि वाढती राजकीय गुंडगिरी यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com