Raigad Diveagar Sea Tragedy : बुडून मृत्यू पावलेल्या 'त्या' आठ विद्यार्थ्यांबाबत सरकारची मोठी घोषणा; कुटुंबीयांना आर्थिक मदत, गोगावलेंनी दिली माहिती

Alandi 8 Students Drown in Diveagar Raigad : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी पुण्यातील आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.
Diveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Diveagar Beach Drawn 8 Students from Pune AlandiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : पुण्यातील आळंदी येथून विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची सहल दिवेआगर येथे गेली होती. मात्र, या सहलीदरम्यान आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. ही दुर्दैवी घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. आता या दुर्दैवी घटनेनंतर मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम सरकार करत आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. याबाबतची माहिती रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.

१ ऑक्टोबर रोजी पुणे, आळंदी येथील विनर्स अकॅडमीचा ४८ जणांचा ग्रुप दिवेआगर समुद्रकिनारी फिरायला गेला होता. यामध्ये शिक्षकांचाही समावेश होता. रायगड किल्ला पाहून झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले होते.

समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी पाण्यात बुडाले. या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली होती. तर पुण्यातील आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. दरम्यान, या घटनेबाबत मंत्री गोगावले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर आता मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Diveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Diveagar Accident Update: दिवेआगरमध्ये 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; आळंदीतील विनर्स अकॅडमीला टाळे, पालक संतप्त, कर्मचारी कुठे?

दिवेआगर येथे घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी शासनस्तरावर आमचा प्रयत्न राहणार आहे. तसेच रायगडमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी, असे आवाहनही मंत्री गोगावले यांनी केले आहे.

Diveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Bharat Gogawale : तटकरेंच्या समोरच गोगावलेंचा ग्रामस्थांना मोठा शब्द; 'पालकमंत्रीपद पणाला लावावे लागले तरी मागे हटणार नाही'

याचबरोबर गोगावले यांनी रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर लक्ष असून, परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे सांगितले. नियमानुसार आवश्यक ती मदत बाधित शेतकऱ्यांना दिली जाईल. तर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, यासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली आहे. त्यामुळे मजुरांनी रोजगारासाठी स्थलांतर करू नये, असे आवाहनदेखील गोगावले यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com