

दिवेआगर ग्रामपंचायतीत विजय तोडणकर सरपंच म्हणून विजयी झाल्याने राष्ट्रवादीला धक्का.
तटकरे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव वाढला.
रायगडमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता.
Raigad Political News : नुकताच लागलेल्या दिवेआगार ग्रामपंचायतीच्या निकालामुळे रायगडचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. येथे नवनिर्वाचित सरपंचाने थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधातच दंड थोपाटले. तसेच त्यांना मनमानी, हुकूमशाही असे म्हणत दम भरण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर आता तटकरे खवळले असून त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचे काम केलं आहे.
आपल्या सहमतीमुळेच आज शिवसेना जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी असल्याचे म्हटले आहे. तटकरे शासकीय आढावा बैठकांच्यानिमित्ताने अलिबागमध्ये येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकारांसी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. तटकरे यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकताच झाल्या. यावेळी जिल्ह्यासह कोकणाचे लक्ष हे श्रीवर्धनमधील दिवेआगार ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागले होते. दिवेआगारमध्ये सत्तांतर होऊन दिवेआगर विकास आघाडीचे (शिवसेना) विजय तोडणकर सरपंच झाले. यानंतर त्यांनी मनमानी, हुकूमशाही आणि लोकांना गृहीत धरण्याचे राजकारण दिवेआगारमध्ये चालणार नाही, असे म्हणत तटकरे यांना दम भरला.
रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी देखील तटकरे यांच्या निशाना साधला. श्रीवर्धन मतदारसंघात परिवर्तनाची लाट उसळली असून तटकरेंना श्रीवर्धनमधून हद्दपार करणार असून राष्ट्रवादीचा परतीचा प्रवास सुरू झालाय असा दावा केला. तसेच तटकरे यांना हद्दपार करून पुन्हा एकदा श्रीवर्धन मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वासही व्यक्त केला.
त्यानंतर आता तटकरे यांनी यासर्व राजकीय नेमबाजीवरून थेट शिवसेनेलाच फैलावर घेतले आहे. त्यांनी, रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीला निर्विवादपणे बहुमत मिळाले. तरीही महायुती म्हणून आम्ही शिवसेनेला सहभागी करुन घेतले. यासाठी राज्यस्तरीय नेत्यांनी धरलेला आग्रह आणि माझी सहमतीमुळेच रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेना सहभागी होऊ शकली, असे म्हटले आहे.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत दक्षिण रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व युती होती. तर कर्जत, खालापूरमध्ये राष्ट्रवादीसमवेत ठाकरे शिवसेना अशी युती होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला १६ जागा तर भाजपला १५ अशा जागा मिळाल्या. याशिवाय कर्जत, खालापूरमधून विजयी झालेल्या ठाकरे शिवसेनेचे ३ आणि उरणमधील काँग्रेसच्या २ सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला असला तरी आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहोत, असे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले आहे. या पाच सदस्यांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीची सदस्यसंख्या २१ अशी झाली.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे एकूण सदस्यसंख्या ३७ अशी होते. यामुळे आमच्याकडे पूर्ण बहुमतही होते. तरीही शिव-सेनेलाही रायगड जि.प.च्या सत्तेत सहभागी करुन घ्यावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून आला. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री सुनेत्रा फडणवीस, यांच्यासमवेत एक बैठक झाली. त्यांनी आदेश दिला आणि माझ्या सहमतीमुळे आज शिवसेना सत्तेत आहे, असा दावा त्यांनी केला.
श्रीवर्धन मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यातील महत्वाची असणारी ग्रामपंचायतच त्यांच्या हातातून निसटली. येथे शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आली. तसेच सरपंच ही त्यांच्याच झाला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायत, श्रीवर्धन नगरपालिका आणि आता दिवेआगर ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत म्हणजेच राष्ट्रवादी विरोधी गटाची सत्ता स्थापन झाल्याने शिवसेनेचे मनोबल वाढले आहे. तर मंत्री अदिती तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची सरशी होते असल्याचेही एकंदरीत चित्र निर्माण झालं आहे.
1. दिवेआगर निवडणुकीत कोण जिंकले
विजय तोडणकर सरपंच म्हणून विजयी झाले
2. या निकालाचा कोणावर परिणाम झाला
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला
3. तटकरे यांनी काय वक्तव्य केले
त्यांनी म्हटले की त्यांच्या सहमतीमुळेच शिवसेना सत्तेत आहे
4. या वक्तव्यामुळे काय घडले
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात तणाव वाढला
5. पुढे काय होऊ शकते
रायगडमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.