Bharat Gogawale : रायगडचे राजकीय तापमान वाढले, पालकमंत्रीपदावर गोगावलेंचे सूचक वक्तव्य चर्चेत; 'मला ग्रीन सिग्नल'

Bharat Gogawale On Raigad Guardian Minister Post : रायगडच्या पालमंत्रीपदावरुन शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेली रस्सीखेच अखेर संपण्याची शक्यता आहे.
Raigad Guardian Minister Post; Bharat Gogawale
Raigad Guardian Minister Post; Bharat Gogawalesarkarnama
Published on
Updated on

Raigad News : रायगडच्या पालमंत्रीपदावरुन शिवसेना आणि दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीच यावर लवकरच पडदा पडेल असे संकेत दिले होते. यानंतरही या मुद्द्यावरून वेळोवेळी नेत्यांची वक्तव्य समोर येतात. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी मीच पालमंत्री होणार असून मलाच ग्रीन सिग्नल आहे. माझ्या कपड्यावरुन समजून जा, असे वक्तव्य केले आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच घोषित करतील असं वक्तव्य देखील गोगावले यांनी केलं आहे. दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील याची घोषणा आठ दिवसात होईल असा दावा केला आहे. यामुळे रायगडच्या पालमंत्रीपदाची घोषणा 15 ऑगस्ट अगोदर होईल असे बोलले जात असून गोगावलेंना पालकमंत्री पद निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आले असून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप मिटलेला नाही. पण नुकताच झालेल्या कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर हा मुद्दा मार्गी लागणार असून मंत्री भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असे चर्चा आहे.

Raigad Guardian Minister Post; Bharat Gogawale
Bharat Gogawale : 'MLC'च्या जागेवरून महायुतीत डिल? गोगावलेंच्या पालकमंत्री पदाच्या वक्तव्याने चर्चांना उधाण; अखेर हायव्होल्टेज ड्रामा संपला?

दरम्यान जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासह आता आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मागणी केली आहे. तर ते मंत्री भरत गोगावले यांनाच मिळाले असेही म्हटले आहे. आता गोगावले यांनी देखील रखडलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठ विधान करताना आपणच रायगडचे पालकमंत्री आहोत असे म्हटले आहे.

Raigad Guardian Minister Post; Bharat Gogawale
Bharat Gogawale : गोगावलेंच्या कुटुंबातील आणखी एका सदस्य राजकारणात प्रवेश! नव्या एन्ट्रीमुळे स्थानिक राजकारणात पकड आणखी मजबूत

याबाबत आपल्याला कधीच ग्रीन सिग्नल मिळाला असून यासाठीच आज आपण हिरवा सदरा देखील घातला आहे. यावरून तुम्ही समजून, मलाच रायगडचे पालकमंत्री पद मिळेल असेही म्हणत त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर आपल्याकडून शिक्कामोर्तब केला आहे. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अधिवेशन संपल्यानंतर कागदोपत्री पुढील 15 दिवसांच्या आत घोषणा करतील. आणि मला पालकमंत्री पद मिळेल असा दावा गोगावले यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com