Eknath Shinde Shivsena leader murder
Eknath Shinde Shivsena leader murderSarkarnama

Eknath Shinde Shivsena leader murder : कावळ्याची घिरट्या घालणारी काव.. काव..! अन् रस्त्यावर कोसळला शिंदेंचा शिलेदार; मंगेश काळोखेंवर तुटून पडले, क्षणात...

Shocking Video Surfaces of Eknath Shinde ShivSena Leader Mangesh Kalokhe Murder in Khopoli : एकनाथ शिंदे शिवसेनेचे खोपोलीतील मंगेश काळोखे यांच्या हत्येचा थरकाप उडवणारे व्हिडिओ समोर आले आहेत.
Published on

Raigad Khopoli murder video : सकाळी वेळ. थंडीमुळं रस्त्यावरची वर्दळ काहीशी कमी. यातच दोघांची भर रस्त्यात रंगलेली चर्चा. कावळ्याची काव... काव... करत रस्त्यावर घिरट्या घालणं! मुलीला घेऊन चालेला दुचाकीस्वार अन् त्यामागून अडखळत रस्त्यावर मंगेश काळोखे कोसळले!

पाच जणांनी घेरलं अन् सपासप वार करत क्षणात काळोखेंना संपवल! एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) खोपोलीमधील कार्यकर्त्याची भर रस्त्यात झालेल्या या हत्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

मंगेश काळोखे यांनी पत्नी मानसी काळोखे या खोपोली नगरपालिकेत दुसऱ्यांदा नगरसवेक पदावर विजय मिळवला. या विजयात त्यांचे पती मंगेश यांचा मोठा वाटा होता. पण मंगेश काळोखे यांची निकालानंतर काही तासांत हत्या झाली. या हत्येमागे राजकीय किनार असल्याचं पोलिस तपासात समोर येत आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोळोखे परिवाराची भेट घेतली असतानाच दुसरीकडे ज्या पक्षावर शिवसेनेकडून आरोप होत आहे, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यामुळे खोपोलीतले राजकीय वातावरण आगामी काळात आणखी तापणार असल्याचं चित्र आहे.

Eknath Shinde Shivsena leader murder
Khopoli murder case : शिवसेनेच्या शिलेदाराच्या हत्येनंतर शिंदे आक्रमक, केली मोठी घोषणा; म्हणाले, 'केस फास्ट ट्रॅक अन् गुन्हेगारांना फासावर...'

मंगेश काळोखे यांच्या हत्येचा थरात सीसीटीव्ही कैद झाला आहे. याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. पण हत्या पूर्वनियोजित होती, असे आता तपासात समोर येत आहे. हत्येचा व्हिडिओ थरकाप उडणारा आहे.

Eknath Shinde Shivsena leader murder
Radhakrishna Vikhe Patil : ठाकरे बंधू, दोन्ही पवार अन् थोरातांना मंत्री विखेंनी एकाचवेळी 'अस्मान दाखवलं'!

रस्त्यावर घिरट्या घालणारा कावळा

सकाळी सुमारे सातची वेळ होती. थंडी असल्याने रस्त्यावर काहीशी वर्दळ कमी होती. व्हिडिओ पहिल्यावर असे दिसते की, दोघं कानटोपी घालून रस्त्याच्या मधोमध गप्पा मारत उभे आहेत. त्यांच्या हातात पिशव्या आहेत. तिथून पुढं काही अंतरावर कावळा काव... काव... करत रस्त्यावर घिरट्या घालत उडत आहे. एक आकाशी रंगाची दुचाकी रस्त्यावर चाललेली दिसते. त्यावर एक पुरूष अन् शाळेतील लहान मुलगी दिसते. हा दुचाकीचा चालक मागे वळून पाहत असतानाच, तिथं मंगेश काळोखे रस्त्यावर अडखळत पडताना दिसत आहे.

दुचाकीस्वार थांबून बघतोय

दुचाकीस्वार पुढे जाऊन थांबून मागे वळून पाहत असतो. इकडे रस्त्यावर पडलेले मंगेश काळोखे यांच्यावर एक जण पांढरी रंगाचा शर्ट अन् काळी रंगाची पँट घातलेला युवक हातातील धारदार शस्त्राने हल्ला करतो. यात मंगेश काळोखे पूर्ण रस्त्यावर कोसळतात. तेवढ्यात आणखी एक जण येतो तो काळोखे यांच्या डोक्यावर सपासपा वार करतो. आणखी तिसरा येतो, तो देखील डोक्यावर वार करत सुटतो. तिथं थांबलेला दुचाकीस्वार तिथून निघून जातो.

काळोखेंवर सपासप वार

हे तिघे काळोखेंवर वार करत असतानाच, आणखी दोघं जण येतात, ते देखील काळोखेंवर वार करतात. या हल्ल्यात काळोखेंचा जागीच मृत्यू झाला. हे पाच जण तेथून पळून जातात. या पाच हल्लेखोरांपैकी चौघांचे काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तसंच पांढर्‍या रंगांनी तोंड झाकलेली होती. पाचही जणांच्या हतात धारदार शस्त्र होती.

शिवसेना-राष्ट्रवादी जुंपली?

मंगेश काळोखे यांच्या हत्येत आतापर्यंत सात जणांना खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. ही हत्या राजकीय कारणातून झाली की अन्य कोणते कारण होते, ते पोलिसांकडून सांगण्यात आलेले नाही. परंतु मंगेश काळोखे हे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचा कट्टर कार्यकर्ते होते. त्यांच्या हत्येत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीकडे बोट दाखवले आहे. गुन्ह्यामध्ये देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे असल्याचे समोर आले आहे.

राजकीय वातावरण तापलं

या हत्येमुळे खोपोलीतील राजकीय वातावरण तापले आहे. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हत्येचा संशय असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याने व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत, खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पोलिसांचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसं या घटनेत खळबळजनक खुलासे होत आहेत. त्यामुळे हत्येची ही घटना शिवसेना-राष्ट्रवादीमधील पुढील काळात अधिक राजकीय संघर्ष निर्माण करणारी ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com