Shivsena Setback : शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार! खोपोलीत अंतर्गत धुसफूसीचा स्फोट, शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Raigad Shivsena Vs NCP Politics : विधानसभा, नगरपालिकेसह काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीतील शिंदेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार वाद पाहायला मिळाला होता.
Shivsena Eknath Shinde
Shivsena Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खोपोलीत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.

  2. सुनील तटकरे यांनी नव्या सदस्यांचे स्वागत केले.

  3. महेंद्र थोरवे यांच्यासाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे.

khopoli shivsena vs ncp : राज्याच्या सत्तेत एकत्र असणाऱ्या शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद अद्याप शांत झालेला दिसत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर सतत टीका करणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांचा करेक्ट कार्यक्रम त्यांच्याच मतदार संघात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खोपोलीत योग्य फिल्डींग लावत थोरवे यांच्या जवळचे लोक फोडले आहेत. त्यांनी शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा फायदा उचलत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, कर्जतचे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवून पराभूत झालेल्या काही उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. तर या प्रवेशासाठी सुधाकर घारे यांनी प्रवेशासाठी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

तर नगरपालिकेची खोपोली निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू होती. यामुळे महेंद्र थोरवे यांच्या जवळचे सहकारी राष्ट्रवादीत गेल्याचे समोर येत आहे. तर हा प्रवेश आता थोरवे यांच्यासह शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

Shivsena Eknath Shinde
Shivsena UBT Setback : ठाकरे गटाला मोठा धक्का! असंतोषाचा स्फोट, निष्ठावंत शिवसैनिकांची शिंदेंच्या शिवसेनेकडे धाव

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते. पण त्यांना खोपोलीत पिछाडीवर राहावे लागले होते. यानंतरच सुधाकर घारे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. पण त्यांना यश आले नाही. ज्यानंतर त्यांनी खोपोलीकडे विशेष लक्ष घातले. आता त्यांनी थेट मित्र पक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेलाच सुरूंग लावले आहे.

Shivsena Eknath Shinde
Shivsena setback in Kokan : कोकणात शिंदेंना मोठा धक्का? शिवसेना आमदाराकडून भाजला छुपी मदत, माजी जिल्हाप्रमुखाच्या गौप्यस्फोटाने राजकीय भूकंप

FAQs :

1. खोपोलीत कोणत्या पक्षातील नेते पक्षांतरित झाले?
शिवसेना शिंदे गटाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.

2. या नेत्यांचे स्वागत कोणी केले?
खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले.

3. या घटनेचा कोणावर परिणाम झाला?
महेंद्र थोरवे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

4. पक्षांतर का झाले?
शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस असल्याचे सांगितले जाते.

5. पुढे काय होऊ शकते?
स्थानिक राजकारणात आणखी बदल आणि संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com