Raigad Politics : गोगावलेंनी एका दगडात दोन पक्षी मारले; विधानसभा लढवलेल्या शरद पवारांच्या 'त्या' नेत्याला फोडत तटकरेंच्या अडचणी वाढवल्या

Bharat Gogawale’s Political Strategy in Shrivardhan : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालमंत्रिपदावरून शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) टोकाचा संघर्ष सुरू आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचं दिलेलं पालकत्व मुख्यमंत्री फडणवीस यांना चोवीस तासांच्या आत मागे घ्यावं लागलं.
Sharad Pawar, Bharatshet Gogawale, Aditi Tatkare
Sharad Pawar, Bharatshet Gogawale, Aditi TatkareSarkarnama
Published on
Updated on

Raigad News, 13 Apr : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यामुळे सध्या रायगडच्या पालमंत्रिपदाबाबतची जोरदार चर्चा सुरू आहे. शाह रायगडमध्ये आल्यानंतर पालकमंत्रिपदाचा तिढी सुटेल अशी चर्चा सुरू होती.

मात्र, अद्यापही त्याबाबतची तिढी सुटला नसल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालमंत्रिपदावरून शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) टोकाचा संघर्ष सुरू आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचं दिलेलं पालकत्व मुख्यमंत्री फडणवीस यांना चोवीस तासांच्या आत मागे घ्यावं लागलं. त्यावरून शिंदेंच्या सेनचा त्यांना किती टोकाचा विरोध आहे हे दिसून येत आहे.

Sharad Pawar, Bharatshet Gogawale, Aditi Tatkare
Arvinda Sawant Politics: अरविंद सावंत यांचा आक्षेप, चंद्रचूड यांच्यामुळेच महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार?

अशातच आता आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात मंत्री भरत गोगावले यांनी नवा राजकीय डाव टाकला आहे. तो म्हणजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार अनिल नवगणे यांनाच आता शिंदेंच्या शिवसेनेत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

कारण, नुकतंच एका कार्यक्रमात भरत गोगावले आणि अनिल नवगणे हे एका व्यासपीठावर दिसून आले होते. याच कार्यक्रमात बोलताना गोगावले यांनी ते येत्या काही दिवसात स्वगृही परततील असा दावा केला आहे. गोगावले म्हणाले, "पूर्वाश्रमीचे हे आमचेच लोक होते, मागच्या निवडणुकीत त्यांना परिस्थितीनुसार वेगळा निर्णय घ्यावा लागला.

पण येत्या 2 दिवसात ते स्वगृही परततील आणि आम्हालाही तेच अपेक्षित आहे.", त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवगणे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. तर अनिल नवगणे यांचा 15 एप्रिलला शिंदे सेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

Sharad Pawar, Bharatshet Gogawale, Aditi Tatkare
Bharat Gogawale : एकनाथ शिंदेंचा एकच फोन अन् गोगावले तातडीनं मुंबईला रवाना, घडामोडींना वेग

तर नवगणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. शिवाय अदिती तटकरे यांना शह देण्यासाठी त्यांच्या विरोधात लढलेला राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या गटाचा नेता आपल्याकडे घेत गोगावले यांनी नवा राजकीय डाव टाकल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, अनिल नवगणे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अदिती तटकरे यांच्या विरोधात विधानसभा लढवली होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com