ZP budget leak : नवनिर्वाचित अध्यक्षांकडून गोपनीयतेचा भंग? जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्पच लीक

raigad zilla parishad budget leak : रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाचा आराखड्यावरून मोठा राजकीय हायड्रामा झाला असून नवनिर्वाचित अध्यक्षांकडूनच अर्थसंकल्पच झाला लीक झाल्याची चर्चा रंगली आहे.
raigad zilla parishad
raigad zilla parishadsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच लीक झाल्याचा आरोप समोर आला आहे.

  2. अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मसुदा महायुती नेत्यांसमोर उघड केल्याचा आरोप आहे.

  3. या प्रकरणामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

raigad News : जिल्हा परिषदेच्या निकाला नंतर येथे महायुतीची सत्ता येण्यावर मुंबईत निर्णय झाला. तर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून मंगेश वाकडीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पण आता वाकडीकर यांच्याकडूनच भली मोठी चूक घडल्याचे समोर येत असून यांच्याकडून जिपचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच लीक झाल्याचे समोर आले आहे. यावरून आता येथे मोठा राजकीय हायड्रामा सुरू झाला असून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील कुरघोडी चव्हाट्यावर आली आहे. तर यामुळे राजकीय साठमारी सुरू झाल्याची चर्चा जिल्ह्यात होताना दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाचा मसुदा मुख्य कार्यकारी अधिकारी तयार करतात. पण यात अन्य विभागांबरोबरच वित्त विभागाची महत्वाची भूमिका असते. आधी अर्थसंकल्पाचा कच्चा मसुदा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसमोर ठेवला जातो.

येथील चर्चेनंतर आणि शिफारसीनुसार बदल करून तो अध्यक्षांच्या परवानगीने अर्थ व बांधकाम सभापतींकडे पाठवला जातो. ज्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत सादर केला जातो.

raigad zilla parishad
Raigad politics : तटकरेंचा 'प्लस-माइनस'चा खेळ! भाजपसोबत चाल खेळत शिवसेनेला पाडलं कोंडीत, गोगावलेंचं पालकमंत्रीपदाचं स्वप्न ...?

एकीकडे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाची अशी प्रक्रिया असताना मात्र नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी तो महायुतीमधील राजकीय नेत्यांसमोर उघड केल्याचे आता समोर येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच तो लीक झाल्याची चर्चा सुरू झाली असून अध्यक्ष वाकडीकर यांनी गोपनीयतेचाही भंग केल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा आधी गोपनीय आणि सादर केल्यानंतर तो सार्वजनिक होत असताना मात्र अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लीक झाला आहे. जिल्हा परिषद सदस्यांसमोर अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच अध्यक्ष वाकडीकर यांनी तो राजकीय पुढाऱ्यांसमोर उघड केला. यामुळे आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तर वाकडीकर यांची ही कृती गोपनीयतेचाही भंगव करणारी असून जनतेतून निवडून आलेल्या सदस्यांवर अन्याय करणारी आहे. तसेच ती निवडून आलेल्या सदस्यांच्या अधिकारावर गदा आणणारी असल्याचे बोलले जात आहे.

raigad zilla parishad
Raigad ZP : रायगडमध्ये भाजपचे धक्कातंत्र! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून ZP अध्यक्षांच्या नावाची घोषणा; ऐनवेळी कार्यकालही बदलला

FAQs :

1. रायगड ZP मध्ये काय घडले?
अर्थसंकल्प सादर होण्याआधीच तो लीक झाल्याचा आरोप समोर आला आहे.

2. कोणावर आरोप करण्यात आले आहेत?
अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यावर गोपनीयता भंगाचा आरोप आहे.

3. अर्थसंकल्प कुणाला दाखवला गेला?
महायुतीमधील काही राजकीय नेत्यांसमोर मसुदा उघड केल्याचा आरोप आहे.

4. या प्रकरणाचा परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय वाद वाढण्याची शक्यता असून चौकशीची मागणी होऊ शकते.

5. ही घटना का महत्त्वाची आहे?
अर्थसंकल्पासारख्या संवेदनशील दस्तऐवजाची गोपनीयता भंग झाल्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com