Raigad ZP : ZPत भाजपचे धक्का तंत्र! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून नावाची घोषणा; ऐनवेळी कार्यकालही बदलला, शिवसेनेच्या वाट्याला काय?

raigad zilla parishad president election : रायगड जिल्हा परिषदेवरील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असून मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यावर तोडगा निघाला आहे. तर तिन्ही पक्षांना दीड दीड वर्ष अध्यक्षपद वाटून मिळणार आहे.
raigad zilla parishad president election; ravindra chavan, sunil tatkare, Bharat Gogawale And Eknath Shinde
raigad zilla parishad president election; ravindra chavan, sunil tatkare, Bharat Gogawale And Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला.

  2. या फॉर्म्युल्यानुसार अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि सभापतीपद शिवसेनेकडे जाणार आहे.

  3. भाजपचे मंगेश वाकडीकर यांची अध्यक्षपदी निवड निश्चित झाली असून जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष होणार आहे.

Raigad ZP : गेल्या महिन्याभरापासून रायगड जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेला महायुतीतील सत्तास्थापनेचा तिढा आणि राष्ट्रवादी-शिवसेनेतील वादावर पडदा पडला आहे. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदासंदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

याच बैठकीत रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीने एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला. यात अध्यक्षपद भाजपला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला सभापती पदे दिली जाणार आहेत. यानंतर गुरुवारी अध्यक्ष निवड पार पडली. यात ऐनवेळी चर्चेतील नाव बाजूला ठेवून भाजपने मंगेश वाकडीकर यांना संधी दिली आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष होत आहे. तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी निवडणूक ७ फेब्रुवारीला निवडणूक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती करत शिवसेनेविरोधात दंड थोपाटले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यासह आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी आधी महायुतीमधील घटकपक्ष म्हणून विरोधात न लढता एकत्र निवडणुकीला सामोरं जावं अशी मागणी केली होती. तसा जागा वाटपांचा फॉर्म्युला देखील माध्यमांच्या समोर आणला होता.

raigad zilla parishad president election; ravindra chavan, sunil tatkare, Bharat Gogawale And Eknath Shinde
Raigad Zilla Parishad Election : ठाकरेंचा उमेदवार भाजपने पळवला! ‘शेकाप’चा संताप, पनवेल तहसीलवर थेट राडा

मात्र तो राष्ट्रवादी आणि भाजपच्या पचणी पडला नाही. यामुळेच या निवडणुकीत महायुतीमधील घटकपक्ष एकमेकांविरोधात लढले. पण निवडणुकीच्या निकालानंतर येथील चित्र पालटे. ज्या शिवसेनेला रोखण्याचा प्लॅन राष्ट्रवादीनं केला होता त्या शिवसेनेचे सर्वाधिक २१ सदस्य निवडून आले. तर युती असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, भाजपचे १५, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ५ सदस्य आणि काँग्रेसचे २ सदस्य निवडून आले होते.

यानंतर येथील राजकीय वातावरण चांगले तापले. गोगावले यांनी भाजपला सोबत घेवून सत्ता स्थापनेचा दावा केला. जो फेटाळत तटकरे यांनी राष्ट्रवादी आणि भाजपची आधीच युती झाल्याने आम्ही एकत्र आहोत. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे सदस्यही आमच्या सोबत असल्याने आम्हीच सत्ता स्थापन करू असा दावा केला. यानंतर तटकरेंच्या सुरात भाजप नेत्यांनीही सूर मिसळल्याने सर्वाधिक जागा निवडून येऊनही शिवसेनेची कोंडी झाली. तर कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीने नवनिर्वाचित सदस्यांना गोव्याच्या सहलीवर पाठवले. यामुळे सत्ता स्थापनेच्या चर्चेंना खिळ बसली.

पण आता मंत्री गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुढे करत युतीबाबत चर्चेचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात नेला. स्वत: दोन्ही आमदारांना घेऊन त्यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक होऊन रायगड जिल्हा परिषदेच्या तिढ्यावर निर्णय घेण्यात आला आहे. येथे महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.

दरम्यान रायगड जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष व उपध्यक्षपदासाठी आज गुरूवारी (दि. 12) निवड होणार असून महायुतीमुळे रायगडच्या जिल्हा परीषद भाजपचा अध्यक्ष पहिल्यांदाच होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगेश वाकडीकर यांचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातील भाजपसह पनवेलमधील केळवणे गटातील आनंदोत्सवाची तयारी होताना दिसत आहे.

पण यावेळी भाजपच्या धक्कातंत्राचीही चर्चा होताना दिसत असून अध्यक्ष पदाच्या कालावधीतही बदल करण्यात आला आहे. याआधी रायगड जिल्हा परिषदेत पहिली सव्वा वर्ष भाजपचा अध्यक्ष होणार अशी चर्चा होती. तर भाजपचे वैकुंठ पाटील यांची अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते. मात्र आता त्यांच्या जागी मंगेश वाकडीकर यांचे नाव अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले असून दीड वर्षाचा कालावधी असेल. तर उपाध्यक्ष शिवसेनेचा होईल असा निर्णय झाल्याची माहिती मिळत असताच आता उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार असून सभापती पद शिवसेनेकडे जाणार आहे.

raigad zilla parishad president election; ravindra chavan, sunil tatkare, Bharat Gogawale And Eknath Shinde
Raigad Zilla Parishad : भाजपचा सुनील तटकरेंना सबुरीचा सल्ला : शिवसेनेला लांब ठेवायच्या विचाराला ब्रेक मारा; सातारा, सांगलीचे गणित लक्षात असू द्या!

FAQs :

1. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची निवड निश्चित झाली आहे?
भाजपचे मंगेश वाकडीकर यांची अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे.

2. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार पदवाटप कसे झाले आहे?
अध्यक्षपद भाजप, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस आणि सभापती पद शिवसेनेला देण्यात येणार आहे.

3. हा निर्णय कसा घेण्यात आला?
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

4. या निवडीचे विशेष काय आहे?
रायगड जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष होणार आहे.

5. वैकुंठ पाटील यांच्या ऐवजी मंगेश वाकडीकर यांची निवड का चर्चेत आहे?
धक्कातंत्र वापरत वैकुंठ पाटील यांच्या ऐवजी मंगेश वाकडीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने ही निवड चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com