Relief for Congress : काँग्रेसला दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांचा 'तो' आदेश रद्द, राजापूरच्या नगरसेविकेचे पद कायम

Congress Corporator Afroz Zari Case : रत्नागिरीत काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला होता.
Kolhapur Circuit Bench
Kolhapur Circuit Bench Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : रत्नागिरीत मोठा धक्का बसलेल्या काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचे रद्द झालेले नगरसेवकपद उच्च न्यायालयाच्या आदेशाने कायम राहिले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. झारी या डिसेंबर २०२५ मध्ये राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. या निर्णयामुळे महाविकास आघाडीलाही मोठा दिलासा मिळाला आहे.

राजापूर नगरपरिषदेतील काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही अफरोज झारी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने हा आदेश रद्द केला आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही नगरसेवकपद रद्द करण्याबाबतचा आपला आदेश मागे घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पालिकेतील सत्ताधारी महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.

Kolhapur Circuit Bench
Congress MP case : दहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, प्राध्यापक असलेल्या काँग्रेस खासदाराची हकालपट्टी

राजापूर नगरपरिषदेच्या डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून काँग्रेसच्या अफरोज झारी निवडून आल्या होत्या. त्यानंतर, त्यांचे इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील न्हावी जातीचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले होते.

त्रिसदस्यीय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १७ जुलै रोजी हा निर्णय जाहीर केला होता. याप्रकरणी झारी यांच्या विरोधी उमेदवाराने हरकत घेतली होती. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर समितीने हा निर्णय दिला होता. समितीच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी झारी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले होते.

Kolhapur Circuit Bench
Congress News: 'ईव्हीएम'वर शंका, बॅलेट पेपरवर निवडणुका, त्यातही काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का,भाजपचा दणदणीत विजय

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अपील दाखल करण्यात आले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत झारी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा समितीचा निर्णय रद्द करण्यात आला. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नगरसेवकपदासाठी अपात्र ठरविण्याबाबत दिलेला आदेशही रद्द करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com