NCP News : 'इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला का नाही?', भुजबळांची खदखद : तटकरेंचा पलटवार; राष्ट्रवादीतील नव्या वादाने धुरळा

Sunil Tatkare Responds After Chhagan Bhujbal Expresses Disappointment Over Rajya Sabha Selection : राज्यसभेच्या रेसमध्ये असतानाही तिकीट न मिळाने छगन भुजबळ यांच्या मनातील खदखद बाहेर आली होती. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे थेट नाव घेत नाराजी व्यक्त केली होती.
NCP Political Row; Sunil Tatkare Chhagan Bhujbal
NCP Political Row; Sunil Tatkare Chhagan Bhujbalsarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare Responds to Chhagan Bhujbal News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. आधी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी खासदार नवनीत राणा यांचेही नाव चर्चेत होते. तर छगन भुजबळही गेल्या अनेक दिवसापासून राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांनी काही अटी व शर्ती घातल्या आणि त्यांची संधी हुकली.

यानंतर 'मी कबड्डीचा खेळाडू आहे, शतरंजचा नाही' म्हणत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जो न्याय इतरांच्या मुलाबाळांना आहे. तोच मला का नाही असा सवाल उपस्थित करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह इतर काही नेत्यांचे नाव घेतले होते. यावरून आता पक्षात नाराजी नाट्य रंगले असून तटकरेंनी यावर पलटवार केला आहे.

राज्यसभा खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ आग्रही असताना प्रफुल पटेल यांचे खास असलेल्या राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे अनेकांना धक्का बसला तर भुजबळ नाराज असल्याचे समोर आले. भुजबळ यांनी त्यांच्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी अट घालत तसे झाल्यास आपण राज्यसभेवर जाऊ असे म्हटले. पण ऐन वेळी जैन यांना उमेदवारी देत सुनेत्रा पवार यांनी धक्का दिला. तर या धक्कातंत्रात पटेलांसह तटकरेंची भूमिका महत्वाची असल्याची चर्चा सुरू झाली.

NCP Political Row; Sunil Tatkare Chhagan Bhujbal
Sunil Tatkare : लेकाला आमदारकी मिळाल्यानंतर सुनील तटकरेंची पलटी? पालकमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य

या राजकीय खेळीनेच आता भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आहे. तर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून देखील असेच काहीसे वाटतं आहे. त्यांनी, अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, हेच आमचं धोरण आहे. तर मैं कबड्डी का खिलाड़ी हूं, शतरंज का खिलाड़ी नहीं हूं, म्हणत भाष्य केलं.

तसेच इतरांना जो न्याय मिळाला, तो मलाही मिळायला हवा, एवढीच अपेक्षा, व्यक्त केली. काही जण राज्यसभा, लोकसभा सदस्य असून त्यांची मुलं मंत्रीपदावर आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे मलाही तोच न्याय मिळायला हवा, असे मला वाटलं. तर त्यांचे हे वक्तव्य तटकरे यांच्याकडे असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

NCP Political Row; Sunil Tatkare Chhagan Bhujbal
Sunil Tatkare : 'MLC' त मुलीने माघार घेताच दळवींच्या संतापाचा स्फोट, गोगावलेंना फटकारलं तटकरेंवरही तोफ डागली; तर 'शेकाप'सारखा अंत...

यावर आता तटकरेंनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी, ते माझ्या अनुषंगाने बोलले असतील असं मला वाटत नाही. मी, माझी मुलगी आणि आता अनिकेत सुद्धा निवडून आलो आहोत. तर कोणत्याच राजकीय पक्षाला सर्वांचे समाधान करणे शक्य नाही. प्रत्येकाला अपेक्षा असतातच. काही लोकांची वेगळी भावना होऊ शकते. ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राहिले असून त्यांचे काम, योगदान मोठे आहे. मी लवकरच त्याविषयीही त्यांच्याशी चर्चा करेन असे म्हणत तटकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com