Shekap Politics : एकेकाळी ‘किंगमेकर’ असणाऱ्या शेकापच्या समोर आज अस्तित्वाची लढाई ! अलिबागचा गड राखण्यासाठी प्रतिष्ठाही पणाला

Raigad Alibag Shekap Politics : एकेकाळचा ‘किंगमेकर’ शेकाप आज अस्तित्वाच्या संकटात! रायगडमध्ये लागलेल्या गळतीमुळे तग धरण्यासाठी शेवटची धडपड
Shekap Politics
Shekap Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगडमध्ये कधी किंगमेकर असलेला शेकाप पक्ष आज नेतृत्वाच्या अभावामुळे अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षात आहे.

  2. विधानपरिषद आणि विधानसभा पराभवांनी तसेच पक्षातील गळतीने शेकापची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

  3. सहकार क्षेत्रातील उरलेले वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करत पक्ष आज प्रामुख्याने अलिबागपुरता सीमित झाला आहे.

Raigad News : कधीकाळी रायगडच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावणारा शेतकरी कामगार पक्षाची अवस्था आता ढासळत चाललेल्या किल्ल्या प्रमाणे होताना दिसत आहे. येथे विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर पक्षाची वाताहत झाली असून प्रमुख नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करत शेकापला रामराम ठोकला आहे. यामुळे आता जिल्ह्यात केंद्रस्थानी असणारा शेकाप आज आपली अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहे.

एकेकाळी जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीवर शेतकरी कामगार पक्षाचा पगडा होता. या पक्षाने मंत्रिपदे तसेच विरोधी पक्षनेतेपद अशी महत्त्वाची पदे भूषविली होती. पण आजच्या घडीला हा पक्ष पूर्पणणे रसातळाला गेल्याचे दिसत असून पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पक्षातील जुने जाणते नेते पक्षात रहायला तयार नाहीत. नवी पिढीला पक्षात यायला तयार नाही अशीच स्थिती सध्या पक्षात दिसत असल्यानेच शेकापने आता बदल स्विकारण्यास सुरूवात केली आहे.

अलिबागमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्षाला विधानपरिषद लोकसभा आणि विधानसभेनंतर गळती लागली असून ती अद्याप थांबलेली नाही. अलीकडेच पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, अलिबागचे दिलीप भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असताना आता उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. या राजकीय संन्यासाच्या निर्णयामुळे शेकापची मोठी हाणी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Shekap Politics
Shetkari Kamgar Paksh : 'शेकाप'चे 19वे अधिवेशन पंढरपुरात होणार; शरद पवार असणार प्रमुख पाहुणे!

दरम्यान एकीकडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना आक्रमकपणे विरोधकांना जेरीस आणत असून ठाकरेंच्या शिवसेनेनंतर येथे शेकापचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेकापला आता जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांमध्ये दावेदारीसाठी सक्षम उमेदवार उभे करता आलेले नाहीत. यावरून जिल्ह्यात पक्षाची स्थिती कमकुवत झाल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शेकापने आपले संपूर्ण लक्ष आता अलिबाग नगरपरिषद निवडणुकीवर केंद्रित केले आहे.

जिल्ह्यात पूर्णपणे बँकफुटवर गेलेल्या शेकापने नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट मूव्ह खेळत अलिबाग नगराध्यक्षपदासाठी अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच शेकापकडून काही महत्वाच्या ठिकाणी नगरसेवकपदासाठी उमेदवारीची घोषणाही केली आहे. ही घोषणा करताना शेकापची आहे ती ताकद वाचवण्यासह पक्षाला तगण्याची धडपड सुरू असल्याचे आता दिसत आहे.

गेली 78 वर्षात मंत्रिपदे तसेच विरोधी पक्षनेतेपद अशी महत्त्वाची पदे भूषविलेल्या पक्षाची आता विविध कारणांनी अधोगती झाल्याची येथे चर्चा सुरू आहे. पक्षातील घराणेशाही, नव्या पिढीतील नेतृत्वाचा अभाव, वाढती राजकीय स्पर्धेसह सत्तेत असणाऱ्या पक्षांकडे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह महत्वाच्या नेत्यांनी दिलेले झुकते माप हे मुद्दे यात अग्रभागी आहेत.

तरीदेखील मागचा इतिहास पाहता मागच्या वेळी शेकापचे 17 च्या 17 जागा निवडून आल्या होत्या. तर त्यापूर्वीच्या निवडणुकीत फक्त एका जागेवर विरोधकांना यश मिळाले होते. यामुळे आताही अलिबागचा गड शेकापसाठी सध्यातरी अभेदच आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे घटकपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या दोन्ही पक्षांना सर्व जागांसाठी सक्षम उमेदवार उभे करता आलेले नाहीत. त्यामुळे अक्षया नाईक यांना थेट आव्हान नसल्याचे दिसत आहे.

प्रतिष्ठेची लढाई

अलिबाग नगरपरिषद निवडणूक शेकापसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीतील यश पक्षाच्या अस्तित्वाला आवश्यक ऊर्जा देऊ शकते, तर पराभवाने शेकापचा अस्तकाल आणखी वेगाने जवळ येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शेकाप आता या निवडणुकीला 'प्रतिष्ठेची लढाई' मानूनच पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि अन्य राजकीय हितसंबंधाचाही साथ घेतली जात आहे.

Shekap Politics
Shetkari Kamgar Party : महाराष्ट्र दणाणून सोडणाऱ्या 'शेकाप'ची धुळधाण... 'सगळ्यांनी' मिळून काढला काटा!

FAQs :

1) शेकापची ताकद इतकी का घटली?
निवडणूक पराभव, नेतृत्वाचा अभाव आणि पक्षफुट यामुळे पक्षाचे राजकीय अस्तित्व ढासळले.

2) रायगडमध्ये शेकाप पूर्वी कशासाठी ओळखला जायचा?
किंगमेकरची भूमिका, सहकार क्षेत्रातील मजबूत पकड आणि ग्रामीण जनाधार.

3) पक्षाला सर्वाधिक फटका कुठे बसला?
रायगड जिल्ह्यातील परंपरागत बालेकिल्ल्यांतून मोठ्या प्रमाणात गळती झाली.

4) शेकाप आज कुठे टिकून आहे?
अलिबागमध्ये पक्ष अजूनही काही प्रमाणात सक्रिय असून अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे.

5) शेकापचे भविष्य कसे दिसते?
नवीन नेतृत्व आणि मजबूत संघटना उभी केली तर पुनरुत्थानाची शक्यता आहे, अन्यथा अस्तित्व धोक्यात राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com