राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद विकोपाला? शिंदेंच्या शिलेदाराने प्रदेशाध्यक्ष तटकरेंनाच घेतलं अंगावर; म्हणाले, 'तर तटकरे जन्माला आलेही नसते...'

Shivsena Vs NCP Political War In Raigad : रायगडमधील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा खासदार तटकरेंनाच आव्हान दिलं आहे.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. शिवसेना मंत्री गोगावले यांचे कट्टर समर्थक आमदार महेंद्र दळवी यांनी सुनिल तटकरे यांच्यावर टीका केली.

  2. रोहा येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात त्यांनी तडकाफडकी वक्तव्य केले.

  3. "सुनिल तटकरे यांना राजकीय दृष्ट्या संपवणार" असे त्यांनी जाहीर केले.

  4. दळवी यांनी "आम्हीही तगडे आहोत" असा थेट इशाराही दिला.

  5. या वक्तव्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष पुन्हा पेटला आहे.

Raigad News : रायगडमधील पालकमंत्री पदाचा वाद अद्याप मिटलेला दिसत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेली रस्सी खेच आताही पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षात सुरू असणारा वादही थांबताना दिसत नाही. दरम्यान कालच (ता.8) मंत्री भरत गोगावले यांनी, रायगडच्या विकासासाठी आदिती तटकरे आणि आपण एकत्र आहोत, त्यात कोणाही राजकारण आणू नये असे म्हटले होते. या गोष्टीला अद्याप 24 तासही होत नाही तोच मंत्री गोगावले यांचे कट्टर समर्थक आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंना डिवचलंय आहे. त्यांनी आम्ही तटकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा विडा उचलायचा असून आम्हीही तागदवान आहोत, असा इशारा दिला आहे. ते रोहा येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात गोगावले व्यासपिठावर असताना बोलत होते.

रायगडमधील पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला गेला असून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात वाद चिघळताना दिसत आहे. या वादाची झळ महायुतीला आता बसली असून आगामी स्थानिकच्या निवडणुकीत जिल्ह्यात फक्त युती होईल महायुती नाही अशी शक्यता आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : रायगडमध्ये तटकरे वादळ! शिवसेनेच्या गोटातच धडाकेबाज डाव!

त्यातच शिंदेंच्या आमदारांनीच महायुतीत आता फक्त भाजप राष्ट्रवादीच युती असेल अशी घोषणा केली आहे. यामुळे येथील युतीचा निर्णय पक्षाच्या नेत्यांच्या कोर्टात गेला आहे. तर रायगडच्या पालकमंत्री शिवसेनेचाच असेल तोही भरतशेठच होईल असा ठाम पवित्रा शिंदेंच्या आमदारानी घेतलं आहे. यामुळे दावा केला आहे. यामुळे येथील राजकीय वातावरण तापलेलं आहे.

अशातच आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांनी व्यासपीठ शेअर करत खुर्चीला खुर्ची लावूनही बसल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी मनमोकळ्या गप्‍पा मारल्या. यानंतर "पालकमंत्रिपदाबाबत दोन्‍ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आम्‍ही दोघे रायगडच्‍या विकासासाठी एकत्र राहू, असे आश्वासन आदिती तटकरे यांनी दिले. तर आम्‍ही दोघं चांगल्‍या कामासाठी एकत्र आलो आहोत, यात कुणी राजकारण आणू नये अशी ठाम भूमिका गोगावले यांनी घेतली आहे. यामुळे रायगडमध्ये सध्या पालकमंत्रिपदाचा वाद मिटला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

यादरम्यान आता रोहा येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांना पुन्हा डिवचल आहे. यावेळी मंत्री गोगावले व्यासपिठावर होते. आमदार दळवी यांनी, रायगड जिल्हा परिषद सदस्य भाई पाशिलकर यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना, भाई उलट्या मार्गाने गेले असते तर तटकरे जन्माला आले नसते, असे अनेक आहेत ज्यांना या महाभागाने संपवले आहे, अशी खोचक टीका केली आहे.

आता आपल्याला तटकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा विडा उचलायचा आहे. सगळ्या गोष्टींनी आम्ही तागदवर आहोत, आम्ही काही कमी नाहीत, हेच तटकरेंना ही दाखवून द्यायचं आहे, असेही आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare: "1978 नंतर... पुन्हा एकदा पवारांना मुख्यमंत्रीपद"; सुनील तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय?

FAQs :

प्रश्न 1: महेंद्र दळवींनी सुनिल तटकरे यांच्याबाबत काय म्हटले?
उत्तर: त्यांनी तटकरे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा विडा उचलला असल्याचे सांगितले.

प्रश्न 2: हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
उत्तर: रोहा येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात.

प्रश्न 3: महेंद्र दळवी कोणाचे समर्थक आहेत?
उत्तर: शिवसेना मंत्री गोगावले यांचे कट्टर समर्थक आहेत.

प्रश्न 4: दळवींनी कोणता संदेश दिला?
उत्तर: "आम्हीही तगडे आहोत" असे सांगून त्यांनी आपली ताकद दाखवली.

प्रश्न 5: या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय झाला?
उत्तर: शिवसेना-राष्ट्रवादी वाद अधिक चिघळला आणि खळबळ उडाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com