Bharat Gogawale: भरतशेठ फलोत्पादन मंत्री झाले, आता त्यांना पालकमंत्री व्हायचंय! रायगडवर ठोकला दावा

Shivsena MLA Bharat Gogavale News : शिवसेनेचे रायगड जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री आमचाच होणार असे स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिले आहे. पालकमंत्रिपदासाठी गोगावले आग्रही आहेत.
Bharat Gogawale
Bharat Gogawale Sarkarnama
Published on
Updated on

Bharat Gogavale: शिंदे सरकार असताना गुडघ्याला मंत्रिपदाचे बाशिंग बांधून बसलेले भरत गोगावले यांच्या गळ्यात अखेर मंत्रिपदाची माळ पडली आहे. खातेवाटपात नाव जाहीर झाल्यानंतर ते आपले होमटाऊन असलेल्या रायगडकडे रवाना झाले. रायगड जिल्ह्याच्या वेशीवर कळंबोली येथे गोगावले यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.

मंत्री झाल्यानंतर भरत गोगावले यांचे पहिल्यांदाच आज रायगड जिल्ह्यात आगमन झाले. महाड मतदारसंघाला 20 वर्षानंतर प्रथमच मंत्रिपद मिळाले. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिकांनी ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.

रोजगार हमी,फलोत्पादन मंत्रिपदी गोगावले यांची वर्णी लागली आहे. आता त्यांना रायगड जिल्ह्यांचा पालकमंत्री होण्याचे वेध लागले आहे. याबाबत त्यांनी इच्छा बोलून दाखवली आहे. विधानसभा जिंकल्यानंतर मी मंत्री होणारच असे ठामपणे सांगणारे भरतशेठ यांनी रायगड पालकमंत्रीपदासाठी दंड थोपटलं आहे. त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकला आहे.

Bharat Gogawale
NCP News: शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य अन् एकीकरणाची चर्चा

रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही. मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार, असा दावा भरत गोगावले यांनी केला केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे रायगड जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री आमचाच होणार असे स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिले आहे. पालकमंत्रिपदासाठी गोगावले आग्रही आहेत.

गोगावले यांच्या स्वागतासाठी कळंबोली नाका येथे हजारो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी 10 जेसीबीमधून गोगावले यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांच्यासाठी भलामोठा हार आणण्यात आला होता. मंत्रिपद मिळाल्यानंतर पालकमंत्रिपदही आपल्यालाच मिळेल, असा विश्वास गोगावले यांना आहे. यापूर्वीही पालकमंत्रिपद शिवसेनेकडेच होतं.आणि जिल्ह्यात आमचे तीन मंत्री आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदावर आमचाच दावा असल्याचे गोगावले यांनी सांगितलं. रायगडच्या पालक मंत्री पदावरून कुठलीही रस्सीखेच नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com