

Pune News : जमिनीच्या वादातून शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे याने गोळीबार करण्यात आलाचा धक्काप्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सूस-नांदे रस्त्यावरील एका बांधकाम प्रकल्पावर गुरुवारी मध्यरात्री घडला.
या प्रकरणात बावधन पोलिसांनी बाळासाहेब रामदास चांदेरे (वय ५४, रा. सूस, ता. मुळशी) आणि संदेश सतीश माने (वय ३७, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी नागेश राठोड (रा. नऱ्हे, मूळ नांदेड) यांनी फिर्याद दिली. नागेश हे बुधवारी रात्री राहुल प्रेम सरकार, मेहबूब शेख, विकास पानसरे, वरद भोसले आणि कुणाल चाटे यांच्यासमवेत भूमकर पूल परिसरात भेटले होते. दरम्यान, राहुल सरकार यांनी आपण सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या सुसगाव येथील बांधकाम प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले.
त्यानुसार नागेश, राहुल आणि मेहबूब यांना यश जगताप व आदित्य मारणे यांनी मोटारीतून सूस येथील ओम पॅराडाइज इमारतीसमोरील जागामालक लहुराज माळी यांच्या बांधकाम प्रकल्पावर सोडले. काही वेळाने बाळासाहेब पांढऱ्या मोटारीतून तेथे आला. त्याने फिर्यादीसह त्यांच्या मित्रांना शिवीगाळ, दमदाटी, तसेच राहुल यांना मारहाण केली.
त्यानंतर राहुल यांनीही प्रतिकार केला. याचवेळी चांदेरे याने पिस्तूल काढले. त्यावेळी आणखी एक जण दुचाकीवर तेथे आला आणि त्यानेही शिवीगाळ केली. चांदेरे याचे पिस्तूल पाहताच नागेश, राहुल आणि मेहबूब यांनी पळ काढला. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना एक गोळी झाडल्याचा आवाज आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.