

Retired IAS officer son : लग्नासाठी नकार दिला म्हणून एका निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या लेकाने ३८ वर्षीय महिलेला बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
देवाशिष निगम असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) कानपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आयआयटी कानपूरमध्ये नोकरीस आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास निगम याने या महिलेला कामाच्या ठिकाणाहून कारमध्ये घेतले. तिथून रस्त्याने जात असतानाच दोघांमध्ये लग्नावरून वाद झाले.
निगम याच्याकडून लग्नासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. लग्नास नकार दिल्यानंतर त्याने मारहाण केली. भररस्त्यात कार उभी करून बाहेर काढले. रस्त्याच्या कडेला पडलेली वीट उचलून त्याने महिलेला मारहाण करण्यास सुरूवात केली.
घाबरलेल्या महिलेने बचावासाठी स्वत:ला कारमध्ये कोंडून घेतले. पण आरोपीने विटेने कारची काच फोडत दार उघडले, असे पोलिसांनी सांगितले. महिलेला कारमधून बाहेर ओढल्यानंतर निगम याने पुन्हा मारहाण सुरू केली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी निगम याला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सोपविले.
स्थानिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. पोलिस आल्यानंतर त्याने आपण निवृत्त आयएएस अधिकारी असल्याचे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस तपास निगम याचे आधीच लग्न झाले असून त्याला एक मुलगीही आहे. तर पीडित महिला विधवा असून तिलाही एक मुलगी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.