Sindhudurg ZP Result : तळकोकणात महायुतीच सत्तेवर, पण बंडखोरांनी शिवसेनेच्या 4 अन् भाजपच्या 2 उमेदवारांना चारली पराभवाची धूळ

sindhudurg zilla parishad result : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे निकाल लागत असून अनेक ठिकाणी महायुती बहुमताने सत्तेवर बसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
zilla parishad result; Member of Parliament Narayan Rane, Guardian Minister Nitesh Rane, MLA Deepak Kesarkar
zilla parishad result; Member of Parliament Narayan Rane, Guardian Minister Nitesh Rane, MLA Deepak Kesarkarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत आहे.

  • सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपचे पाच बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आल्याने युतीला मोठा धक्का बसला आहे.

  • या निकालामुळे खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

sindhudurg zilla parishad result News : सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे निकाल अपेक्षित लागत आहेत. महायुती बहुमताने सत्तेवर बसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अजून काही निकाल येणे शिल्लक आहे. एकाबाजूला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असताना विशेषता सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील तब्बल पाच जिल्हा परिषद सदस्यपदी भाजपचे बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.

या अपक्षांना अदृश्य शक्तीचा मोठा हात होता. या अपक्ष शक्तीने या मतदार संघातील भाजप शिवसेना युतीला मोठ्या प्रमाणात छद दिल्याने नेतृत्व करणाऱ्या खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आठ जागा आणि पंचायत समितीच्या १८ जागा बिनविरोध झाल्याने महायुती सत्तेत बसणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाल्यावर निकाल येऊ लागले. परंतु या निकालात विशेषता भाजप मधून बंडखोरी केलेल्या तब्बल सहा उमेदवारांनी बाजी मारून भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना पराभवाची धूळ चारली आहे.

zilla parishad result; Member of Parliament Narayan Rane, Guardian Minister Nitesh Rane, MLA Deepak Kesarkar
Dharashiv Zilla Parishad : एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष, पण बहुमतापासून दूरच! धाराशिवमध्ये महायुती एकत्र येणार की किंगमेकर शिंदेंची शिवसेना नवी चाल खेळणार?

त्यामुळे एकीकडे सत्तेत आल्याचा आनंद असताना बंडखोरांनी मिळविलेला विजय महायुतीच्या नेतृत्वाच्या जिव्हारी लागला आहे. कणकवली आणि कुडाळ विधानसभा मतदार संघात महायुतीने एकहाती वर्चस्व ठेवले आहे. परंतु सावंतवाडी विधानसभेत बंडखोर महायुतीला धोकादायक ठरले आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुतीच्या बंडखोरांनी शिवसेनेचे अधिकृत चार ठिकाणी पराभूत केले आहेत. तर भाजपचे अधिकृत दोन उमेदवार पराभूत केले आहेत. तसेच शिवसेनेला सुटलेल्या आंबोली मतदार संघात भाजपने अधिकृत दिलेला उमेदवार सुद्धा विजयी झाला आहे. संजय पडते, समिधा नाईक या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे या माजी अध्यक्षांनी विजयाचा गुळाला उधळला आहे.

zilla parishad result; Member of Parliament Narayan Rane, Guardian Minister Nitesh Rane, MLA Deepak Kesarkar
Zilla Parishad elections exit poll: जिल्हा परिषदेतही भाजपचाच डंका : एक्झिट पोलमध्ये नंबर वन पक्षाचा अंदाज; सविस्तर आकडे काय?

FAQs :

1. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कोण सत्तेत येणार?
महायुती बहुमताने सत्तेवर बसणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

2. सावंतवाडीमध्ये नेमके काय घडले?
भाजपचे पाच बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.

3. बंडखोरांच्या विजयामागे काय कारण सांगितले जाते?
या विजयामागे ‘अदृश्य शक्ती’ सक्रिय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

4. या निकालाचा राणे कुटुंबावर काय परिणाम होणार?
नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

5. पुढे महायुतीसमोर कोणते आव्हान आहे?
बंडखोरी रोखणे आणि अंतर्गत समन्वय राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com