Shivsena Politics : हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतली? झेडपी तोंडावर नेत्याची केलेली हकालपट्टी शिवसेनेच्या अंगलट; शिंदेंनाही युवासेनेला पडलेलं भगदाड लपवता-लपवता आले नाकीनऊ!

zilla parishad panchayat samiti election : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं मोठी कारवाई करत बंखोरी करणाऱ्या स्थानिक नेत्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण आता हीच कारवाई पक्षाला अंगलट आली आहे.
Shivsena Politics in zilla parishad panchayat samiti election; eknath shinde
Shivsena Politics in zilla parishad panchayat samiti election; eknath shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • युवासेना जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना देसाई यांनी पदाचा राजीनामा दिल्याने दक्षिण रत्नागिरीत राजकीय खळबळ उडाली आहे.

  • हा राजीनामा पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाला थेट धक्का मानला जात आहे.

  • परशुराम कदम प्रकरणानंतर पक्षातील कारवाईविरोधातच ही बंडखोर भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

Ratnagiri News : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 तारखेला मतदान होणार असून 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. आज (ता.३) त्याच्या कोकणात सभा होणार आहेत. त्याच आधी दक्षिण रत्नागिरीत पक्षाने मोठी कारवाई केली. बंडखोरी करणाऱ्या परशुराम कदम यांची थेट हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईनंतर आता राजकीय वातावरण तापले असून युवासेनेला भगदाड पडले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

30 ऑक्टोबर 2024 रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात परशुराम कदम यांनी प्रवेश केला होता. त्यांच्याकडे शिवसेनेचे युवा सेना कोकण विस्तारक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. पण आता याच कदम यांनाच पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

त्यांना प्रवेशावेळी हातखंबा गटातून उमेदवारी देण्याचे आश्वासन पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शब्द दिली होता. पण आश्वासन देवूनही ते पाळण्यात आले नाही. ज्यानंतर नाराज झालेल्या परशुराम कदम यांनी अपक्ष म्हणून हातखंबा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कदम यांचे असे करणे हे सामंत यांनाच आव्हान निर्माण करणारे असल्यानेच त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती.

Shivsena Politics in zilla parishad panchayat samiti election; eknath shinde
Shivsena Politics : 'ZP'च्या तोंडावर शिंदेंची मोठी कारवाई, बड्या नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

या कारवाईनंतर युवासेना जिल्हाप्रमुख केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे युवासेनेच्या गडाला मोठे भगदाड पडले असून पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. देसाई यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा राहुल पंडित यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

परशुराम कदम यांच्या हाकालपट्टी नंतर लगेच देसाई यांनी राजीनामा दिल्याने पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वालाच थेट राजकीय धक्का बसल्याचे येथे दबक्या आवाजात बोलले जात आहे. तसेच देसाई यांना माजी सभापती परशुराम कदम यांच्यावर केलेली कारवाईच मुळात पटलेली नसल्यानेच त्यांनी ही बंडखोर भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

या बंडखोर भूमिकेनंतर आता पक्षातील अंतर्गत नाराजीला उघडपणे उकळी फुटताना दिसत असून संघटनात्मक गोंधळ, अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वावर रोष देसाई यांनी व्यक्त केल्याचेही राजकीय जाणकार सांगत आहेत.

अन्य बंडखोरांचे काय?

जिल्ह्यात शिवसेनेचे काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात जात बंडखोरी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग म्हणून त्यांच्यावरही हकालपट्टीची कारवाई होणार का, असा प्रश्न शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.

...अशीच हकालपट्टी करा

माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्यावर कारवाई झाल्यानंतर हातखंबा गटातीलच युवासेनेचे जिल्हाप्रमुख केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनी राजीनामा दिला आहे. मात्र राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्टेटस लावला आहे. त्यामध्ये ‘असेच एका एकाची हकालपट्टी करा...’ असे म्हटलं आहे. त्यामुळे कदम यांच्या हकालपट्टीऐवजी मुन्ना देसाई यांच्या राजीनाम्याची चर्चा अधिक रंगली आहे.

Shivsena Politics in zilla parishad panchayat samiti election; eknath shinde
Shivsena UBT Politics: ठाकरेंच्या गटनेतेपदी निष्ठावंत केशव पोरजे; शिवसेना महापालिकेत आक्रमक होणार!

FAQs :

1. केदार उर्फ मुन्ना देसाई यांनी कोणत्या पदाचा राजीनामा दिला?
युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

2. त्यांनी राजीनामा कोणाकडे दिला?
जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

3. या राजीनाम्याचा राजकीय अर्थ काय लावला जातो?
हा राजीनामा उदय सामंत यांच्या नेतृत्वाला बसलेला धक्का मानला जात आहे.

4. परशुराम कदम प्रकरणाशी याचा काय संबंध आहे?
कदम यांच्यावर झालेल्या पक्ष कारवाईविरोधातच देसाईंनी बंडखोरी केल्याची चर्चा आहे.

5. याचा युवासेनेवर काय परिणाम होऊ शकतो?
दक्षिण रत्नागिरीतील युवासेनेची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com