Shivsena Setback : ऑपरेशन टायगरनंतर नवे राजकीय वादळ! शिंदेंच्या शिवसेनेला सलग दुसरा झटका! कारणही आलं समोर

Shivsena Ulhasnagar Corporator Disqualified : राज्यात एकीकडे शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा असतानाच उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या बंडखोर खासदाराविरोधात त्यांच्या मतदारसंघात जाऊन रान उठवण्याची रणनीती आखली आहे.
Shivsena Politics eknath shinde
Shivsena Politics eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरे यांचे एकाच वेळी सहा खासदार फुटल्याने राज्यात जोरदार खळबळ उडाली. शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे हा राजकीय भूकंप झाला. ज्यानंतर शिंदेंच्या ऑपरेशन टायगरसह फुटलेल्या खासदारांची राज्यासह देशात जोरदार चर्चा सुरू झाली. यादरम्यान आता उद्धव ठाकरेंनी राज्यभराचा दौरा आखत या बंडखोर खासदारांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच शिंदेंच्या शिवसेनेला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. येथे शिंदेंच्या दुसरा नगरसेवकही अपात्र ठरला असून नगरसेविका पूजा भोईर यांचे नगरसेवक पद गेले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवक विक्की सिंग लबाना यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली होती. जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी विकी सिंग लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. लबाना यांनी बंजारा जातीचे प्रमाणपत्र सादर करून नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातून निवडणूक लढवली होती.

मात्र जात पडताळणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. यानंतर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.

Shivsena Politics eknath shinde
Shivsena UBT-NCP SP Setback : शरद पवारांना मोठा धक्का, ठाकरेंची साथही बड्या नेत्याने सोडली; शिंदेंच्या शिवसेनेला लाॅटरी!

या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यामुळे उल्हासनगर महानगरपालिका राजकारणात मोठी घडामोड घडल्याचे बोलले जात होते. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

या घटनेला फक्त महिनाच झाला असताना शिंदेंच्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. येथे नगरसेविका पूजा भोईर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना महापालिका आयुक्तांनी अपात्र घोषित केले आहे. पूजा भोईर यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद गेलं आहे.

Shivsena Politics eknath shinde
Shivsena Setback : शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार! खोपोलीत अंतर्गत धुसफूसीचा स्फोट, शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आधी विक्की सिंग लबाना आणि आता पूजा भोईर यांचे नगरसेवक पद गेल्याने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एका महिन्याच्या कालावधीत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आल्याने याचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com