

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अद्याप युती किंवा आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही.
अलिबागमध्ये शिंदे सेनेकडून दिलीप भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
जागावाटपात बदल झाल्यास इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
Alibag News : राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मोर्चे बांधणीला वेग आला आहे. राज्यभर आघाड्या, युत्या आणि राजकीय समिकरणांची गोळाबेरीज केली जात असतानाच कोकणात मात्र युती किंवा आघाडीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा होताना दिसत नाही. उलट येथे तटकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेकडून अलिबागमध्ये दिलीप भोईर यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. यामुळे उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
रायगड जिल्ह्यात नुकताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा वाद झाला होता. येथे मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर बंदूक ताण्यात आली होती. तर राष्ट्रवादीच्या नेत्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. यानंतर येथील वातावरण तंग झाले असतानाच निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली. यावरून येथे राष्ट्रवादी विरूद्ध शिंदेंची शिवसेना असा वाद सुरू झाला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्या प्रकरणात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हात असल्याचे सांगत मास्टरमाईंड जिल्हाध्यक्ष घारे असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर अद्याप येथील राजकीय वातावरण शांत झालेले नसून आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने भाजपशी हाथ मिळवणी करत शिवसेनेला बाजूला सारले आहे.
यादरम्यान आता जिल्ह्यात युती किंवा आघाडीबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्ट घोषणा झालेली नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) सोबत युती न करण्याचा ठाम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केला आहे. भाजपसोबत मात्र चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून त्यांनी रायगडच्या राजकीय पटावर नवा वाद निर्माण केला आहे. तर दुसरीकडे शेकाप-काँग्रेस-उद्धव ठाकरे शिवसेना आपले उमेदवार घोषित करीत जोरदार तयारी करत आहेत.
यामुळे जागावाटपात बदल झाल्यास इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरणार असून शिंदे सेनेकडून अलिबागमध्ये दिलीप भोईर यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. तर तटकरे विरुद्ध गोगावले यांच्या वादाचा फटका जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांना बसण्याची चिन्हे दिसत असल्याची चर्चा सुरू आहे.
नाराजांची मनधरणी
दरम्यान जुने, निष्ठावंत कार्यकर्ते आणि अलीकडेच दुसऱ्या पक्षातून आलेले नेते यांच्यातील वाद अधिक तीव्र होत असून ते चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. काही मतदारसंघांत तर उमेदवारी जाहीर होण्याआधीच बंडखोर रिंगणात उतरण्याच्या करत असल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे महायुतीसमोर नाराजांची मनधरणी करण्याचे आव्हान आहे.
1) रायगड जिल्ह्यात कोणत्या निवडणुका होत आहेत?
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत.
2) अलिबागमध्ये शिंदे सेनेकडून कोणाचा अर्ज दाखल झाला आहे?
अलिबागमध्ये शिंदे सेनेकडून दिलीप भोईर यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे.
3) रायगडमध्ये युती जाहीर का झालेली नाही?
जागावाटप व राजकीय मतभेदांमुळे अद्याप युतीबाबत स्पष्ट घोषणा झालेली नाही.
4) या अनिश्चिततेचा उमेदवारांवर काय परिणाम होईल?
जागावाटपात बदल झाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरू शकते.
5) तटकरे आणि शिंदे गटात नेमका वाद कशावरून आहे?
निवडणूक रणनीती व जागावाटपावरून दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.