Operation Tiger News: ऑपरेशन टायगर 3? 6 खासदारांनंतर आता 65 नगरसेवकही ठाकरे यांची साथ सोडणार, नरेश म्हस्केंचा दावा

MP Naresh Mhaske on Operation Tiger 3: शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या फुटीनंतर आता मुंबईतील ६५ नगरसेवकही उद्धव ठाकरे यांची साथ सोडतील, असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
Operation Tiger Maharashtra
Operation Tiger MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Split: उद्धव ठाकरेच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी आज त्यांची साथ सोडली असतानाच एकनाथ शिंदे यांच्या खासदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईत निवडणूक आलेले ठाकरेंचे 65 नगरसेवकही ठाकरे यांची साथ सोडणार आहेत, असे नवे आव्हान शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले आहे. 'साधा कार्यकर्ताही तुमच्याकडे राहणार नाही,' असा शब्दात म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.

६ खासदार आमच्याकडे येणार की नाही, हे मला माहीत नाही. पण मुंबई महापालिकेत तुमचे ६५ नगरसेवक निवडूण आले आहेत त्यापैकी किती तुमच्याकडे राहतात, हे बघा, कोणीही तुमच्यासोबत राहणार नाहीत., तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्ष बुडवणारे संजय राऊत हेच तुमच्यासोबत राहतील. याच्याशिवाय तुमच्यासोबत कुणीच राहणार नाही., असा टोला म्हस्के यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेत दिल्लीमध्ये स्वतंत्र संसदीय गट स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा अध्यक्षांकडून या नव्या गटाला मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय हालचालींना वेग येणार आहे. आता या गटाचा शिवसेना शिंदे गटाशी विलय होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

Operation Tiger Maharashtra
Pune Land Scam: जिल्हाधिकाऱ्यांचा भूमाफियांवर बुलडोझर! पुण्यात 194 कोटींच्या सरकारी जमिनी सरकारजमा

राजकीय वर्तुळात या संपूर्ण घडामोडीला ‘ऑपरेशन टायगर २’ असे नाव दिले जात आहे. मात्र, ही केवळ सुरुवात असून आगामी काळात आणखी काही मोठ्या राजकीय हालचाली होऊ शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता आणखी वाढल्याचे बोलले जाते.

गेल्या काही दिवसांपासून संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे ठाकरे गटात मोठी खळबळ होती. पक्षातील खासदार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते. काही महत्त्वाच्या बैठका आणि रणनीती आखण्यात आल्याची माहिती होती. तरीही अखेर मंगळवारी उशिरा राजकीय घडामोडींना वेग आला आणि सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले.

Operation Tiger Maharashtra
Mahila Bachat Gat: महिला बचत गटांना अडीच एकर जमीन अन् 1 लाखाचे अनुदान मिळणार; सरकारची नवी योजना

परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी नव्या राजकीय समीकरणांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. या सर्व खासदारांनी संसदेतील स्वतंत्र गटाची भूमिका स्वीकारली असून पुढील टप्प्यात शिंदे गटात औपचारिक विलिनीकरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१९ तारखेला होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात हे खासदार सार्वजनिकरित्या आपली भूमिका स्पष्ट करू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com